पोईप येथे योग शिबिर संपन्न.
पोईप येथे योग शिबिर संपन्न.
मसुरे | प्रतिनिधी : श्री श्री १०८ महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरु श्री गावडे काका महाराज संस्थापित श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास रजि. माड्याचीवाडी कुडाळ या संस्थेच्या वतीने, मालवण तालुक्यातील पोईप येथे 'सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल' प्रशालेत योग प्राणायाम शिबिर संपन्न झाले. कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन करून झाला. यावेळी सद्गुरु भक्त सेवा न्यास संस्थेचे योग- प्राणायाम शिक्षक श्री. आनंद सावंत, संस्थेचे विश्वस्त साईप्रसाद पेडणेकर, मसदे मठाचे केंद्रप्रमुख तानाजी पाटील, उमेश मुणगेकर, दादू गावडे, संतोष हिवाळेकर, कोमल पेडणेकर आणि प्रशालेचे मुख्याध्यापक कुंभार, शिक्षक महाजनी, कारंडे, चव्हाण, सौ. सावंत , सौ. राऊळ, नंदकिशोर तावडे आणि शिक्षकेतर कर्मचारी विठोबा माधव,अभिजीत धुरी आणि विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते.
यावेळी या प्रशालेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना योग प्राणायाम विषयी माहिती व प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.तसेच या प्रशालेतील इयत्ता पाचवी ते आठवी या वर्गातील शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे श्री श्री १०८ महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरु श्री गावडेकाका महाराज संस्थापित श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास रजि. माड्याचीवाडी कुडाळ या सामाजिक संस्थेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)