ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
मालवणच्या नूतन नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी पदभार स्विकारला.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवणच्या नूतन नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी पदभार स्विकारला.

प्रकाशन: 26 Dec 2025 11:36 AM
वाचन संख्या 324

मालवणच्या नूतन नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी पदभार स्विकारला. 

Article image


मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्षा सौ ममता वराडकर यांनी २५ डिसेंबर २०२५ रोजी पदभार स्विकारला. नगरपरिषदेच्या सभागृहातील विशेष कार्यक्रमानंतर, सौ. ममता वराडकर यांनी दालनात प्रवेश केला. सौ. ममता वराडकर यांनी त्यांच्या विशेष मनोगता द्वारे सर्व वरीष्ठांचे आभार मानले तसेच सहकार्य केलेल्या सर्वांना धन्यवाद देऊन जनतेच्या विकासासाठी कार्यरत रहायची ग्वाही दिली.

Article image




जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा संघटक तथा माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी शुभेच्छा व मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.

Article image


Article image


Article image

नूतन नगराध्यक्षा सौ ममता वराडकर यांनी भाषणाद्वारे मनोगत व्यक्त केले.


यावेळी नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्यासह शिवसेना शहरप्रमुख व नगरसेवक दीपक पाटकर, नगरसेवक सहदेव बापर्डेकर, नगरसेवक महेश कोयंडे, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, नगरसेविका शर्वरी पाटकर, नगरसेविका नीना मुंबरकर, नगरसेविका पूनम चव्हाण, नगरसेविका मेघा सावंत गांवकर, नगरसेविका अश्विनी कांदळकर, नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांचे स्वागत करण्यात आले.

Article image


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा संघटक व माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उमेश नेरुरकर, राजा गांवकर, विश्वास गांवकर, बाळू तारी, राजन सरमळकर, कमलाकर मांजरेकर, राजू बिडये, बाळू नाटेकर, यशवंत गांवकर, परशुराम पाटकर, अंकित नेरुरकर, स्वप्नाली नेरूरकर, शेखर गाड, जगदीश गावकर, सूर्यकांत फणसेकर, बाबू पराडकर, प्रसाद परुळेकर, नंदू देसाई, मोहन वराडकर, निकेत वराडकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.


नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भाजप नगरसेवक मंदार केणी, भाजपा नगरसेवक ललित चव्हाण, भाजपा नगरसेविका महानंदा खानोलकर, भाजपा नगरसेविका अन्वेषा आचरेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर व नगरसेविका अनिता गिरकर यांनी सौ. ममता वराडकर यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले व सदिच्छा दिल्या.


Article image

नगरपरिषदअधिकारी व कर्मचारी वृंद यांच्यावतीने श्री. पाटकर, श्री आनंद म्हापणकर व श्री. महेश परब यांनी नूतन नगराध्यक्षांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व सदिच्छा दिल्या.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स