ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
आंबेरी गावातील श्रमदानाची कमाल, तीन दिवसांत बांधली अडिचशे फूट लांबीची शाळेची कंपाऊंड वाॅल...!
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

आंबेरी गावातील श्रमदानाची कमाल, तीन दिवसांत बांधली अडिचशे फूट लांबीची शाळेची कंपाऊंड वाॅल...!

आंबेरी गावातील श्रमदानाची कमाल, तीन दिवसांत बांधली अडिचशे फूट लांबीची शाळेची कंपाऊंड वाॅल...!

Article image

ग्रामपंचायत व गावातील संबंधित बांधकाम कामगारांचे ग्रामस्थ आणि पालकांनी प्रशंसा करत मानले आभार. 



मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील आंबेरी येथील पूर्ण प्राथमिक शाळा क्र. १ च्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत व गावातील बांधकाम कामगारांनी एकत्र येत श्रमदानातून शाळेच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम यशस्वीपणे पूर्ण केले आहे. शाळेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही संरक्षक भिंत अत्यंत आवश्यक होती. या उपक्रमासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आणि साहित्याची उपलब्धता करून दिली. २२ ते २४ डिसेंबर या अल्प कालावधीत गावातील सर्व बांधकाम कामगारांनी आपल्या कौशल्याचे आणि मेहनतीचे योगदान दिले. या तीन दिवसांच्या कालावधीत सुमारे २५० फूट लांबीच्या भिंतीचे काम पूर्ण करण्यात आले.

Article image


आंबेरीतील बांधकाम कामगारांनी स्वेच्छेने आणि कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता गावातील मुलांच्या सुरक्षिततेसाठी श्रमदान केले असून ग्रामपंचायतीने साहित्याचा पुरवठा करून या कामाला गती दिली.


या नवीन कंपाऊंड वॉलमुळे शाळेचा परिसर आता सुरक्षित झाला असून विद्यार्थ्यांच्या संरक्षणास मोठी मदत होणार आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे शाळेचे बाह्य रूपही बदलले असून परिसराची शिस्त वाढण्यास मदत होईल. गावातील कामगारांनी दाखवलेली ही एकजूट आणि ग्रामपंचायतीचे नियोजन यामुळेच हे अशक्य वाटणारे काम कमी वेळात पूर्ण होऊ शकले, अशा भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केल्या जात आहेत. आंबेरी परिसरातील पालकवर्ग आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व सर्व श्रमदान करणाऱ्या कामगारांचे आभार मानले आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब

लोकप्रिय टॅग्स