ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
जिल्ह्यातील सर्व खाजगी हॉस्पिटलची धडक मोहीम तपासणी द्वारे होणार तपासणी...!
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

जिल्ह्यातील सर्व खाजगी हॉस्पिटलची धडक मोहीम तपासणी द्वारे होणार तपासणी...!

जिल्ह्यातील सर्व खाजगी हॉस्पिटलची धडक मोहीम तपासणी द्वारे होणार तपासणी...!


महाराष्ट्र नर्सिंग होम कायद्यातील सर्व तरतुदींच्या पालनाची केली जाणार खातरजमा.


सिंधुदुर्ग नगरी | ब्यूरो न्यूज : जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नर्सिंग होम कायदा १९४९ सुधारित नियम २०२१ अंतर्गत नागरी विभागांमध्ये एकूण ५९ खाजगी हॉस्पिटलची नोंदणी आहे. सदर कायद्याअंतर्गत नोंदणीकृत सर्व खाजगी हॉस्पिटलना कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रुग्णालयाकडून आकारण्यात येणारे रुग्णशुल्क व इतर रुग्णालयीन सेवा शुल्क दर पत्रक प्रत्येक खाजगी रुग्णालयाच्या दर्शनी भागामध्ये ठळक लावणे बंधनकारक आहे. तसेच रुग्ण हक्क संहिता (रुग्णांना असलेले अधिकार) दर्शनी भागामध्ये ठळक अक्षरांमध्ये दर्शविणे बंधनकारक आहे. सर्व हॉस्पिटलचे इलेक्ट्रिसिटी आणि फायर ऑडिट झालेले असणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र नर्सिंग होम कायद्यातील सर्व तरतुदींचे खाजगी हॉस्पिटल मधून पालन होते की नाही याची खातरजमा करण्यासाठी, २६ डिसेंबर २०२५ पासून धडक मोहिम चालवली जाणार आहे.  


ज्या खाजगी रुग्णालयांमध्ये नमूद कायद्यातील तरतुदींचे अनुपालन होत नाही असे निदर्शनास आल्यावर सदर कायदे अंतर्गत उचित कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी असे जिल्हा शल्यचिकित्सक, सिंधुदुर्ग यांनी सूचित केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स