आचरे येथे पुरस्कार प्राप्त पुस्तक 'बीज अंकुरे अंकुरे' च्या लेखकांसह विविध जणांचा सत्कार.
आचरे येथे पुरस्कार प्राप्त पुस्तक 'बीज अंकुरे अंकुरे' च्या लेखकांसह विविध जणांचा सत्कार.
ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकुर यांनी संपादित केलेले पुरस्कार प्राप्त विशेष पुस्तक ठरले होते तब्बल अठरा ललित लेखकांच्या प्रोत्साहनाचा 'पुस्तकमंच..!'
ज्येष्ठ कवी रुजारिओ पिंटो यांचा कविता राजधानी पुरस्काराबद्दल सत्कार तर मुंबईस्थित कोमसाप मालवण सदस्य कवी गिरीधर पुजारे व आचरे येथील मंदार सांबारी यांचा 'गानकवी' पुरस्काराने गौरव.
आचरा : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणने सन २०२३ मध्ये, अठरा ललित लेखकांच्या सहाय्याने 'बीज अंकुरे अंकुरे 'हे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक ज्येष्ठ लेखक व कोमसाप मालवण अध्यक्ष ह सुरेश ठाकूर यांनी संपादित केले होते. त्याला अलिकडेच केंद्रीय कोमसापचा आदर्श संपादित ललित पुस्तकाचा वांङमयीन पुरस्कार प्राप्त झाला त्या पार्श्वभूमीवर, कोमसाप मालवणच्या अठरा ललित लेखकांचा गौरव सोहळा कोमसाप मालवणच्या आचरे येथील कार्यालयात श्री. सुरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला तसेच या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून ज्येष्ठ कवी रुजारिओ पिंटो, सुनंदा कांबळे (ज्येष्ठ कवयित्री )हे उपस्थित होते.
यावेळी बीजअंकुरे अंकुरेचे१८ ललित लेखक सौ. पूर्वा मनोज खाडिलकर, तेजल गुरुनाथ ताम्हणकर, ऋतुजा राजेंद्र केळकर, आदिती धोंडी मसुरकर, रश्मी रामचंद्र आंगणे, मधुरा महेश माणगावकर, वर्षाराणी बलवंत अभ्यंकर, रसिका राजेंद्र तेंडोलकर, दिव्या दीपक परब, वंदना नारायण राणे, देवयानी त्रिंबक आजगावकर, विठ्ठल लक्ष्मण लाकम, शिवराज विठ्ठल सावंत, वैजयंती विद्याधर करंदीकर, नारायण यशवंत धुरी, सदानंद मनोहर कांबळी, अशोक धोंडू कांबळी, गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पुस्तक प्रदान करून गौरव करण्यात आला .
यावेळी मुंबईस्थित कोमसाप सदस्य कवी गिरीधर पुजारे व आचरे येथील मंदार सांबारी यांना गानकवी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नेहा बापट आणि चंद्रकला दिवेकर यांना आदर्श कथामाला कार्यकर्ता पुरस्कार तर द. शि. हिर्लेकर गुरुजी यांच्या आत्मचरित्राला गेल्या सहा महिन्यात सहा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याने षटकार पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच सुधाकर वळंजू यांना तज्ज्ञ परीक्षक आणि स्नेहा नारिंगणेकर यांना चोखंदळ वाचक पुरस्कार मालवण कोमसापतर्फे प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त सन्मानितांना मालवण कोमसापतर्फे सन्मानचिन्ह, गौरव पत्र आणि ग्रंथभेट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली .
रुजारिओ पिंटो यांना नुकताच राजधानी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कोमसाप मालवणच्यावतीने बाबाजी भिसळे - अध्यक्ष रामेश्वर वाचन मंदिर आचरा आणि अशोक कांबळी - अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा या ज्येष्ठ कोमसाप कार्यकर्त्यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पुस्तकभेट प्रदान करून गौरविण्यात आले.
'बीज अंकुरे अंकुरे' पुस्तकाचे संपादक सुरेश ठाकूर यांचा कोमसाप मालवणच्या वतीने रुजारिओ पिंटो यांच्या हस्ते सन्मानपत्र ,सन्मानचिन्ह आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सुरेश गावकर, माधव गावकर, अंकुश वळंजू,सुधाकर वळंजू , प्रकाश पेडणेकर, कुमार कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला अनिरुद्ध आचरेकर, पांडुरंग कोचरेकर, रामचंद्र कुबल, श्रुती गोगटे, एकनाथ गायकवाड, सुरेंद्र सकपाळ, रमाकांत शेटये, अनघा कदम, विनोद कदम, महादेव बागडे, भावना मुणगेकर, कामिनी ढेकणे, रावजी तावडे, वर्षा सांबारी, चंद्रशेखर धानजी, गोविंद प्रभू, श्रावणी प्रभू, त्रिंबक आजगावकर, शरयू हिर्लेकर या कोमसाप मालवणच्या सदस्यांसोबतच बहुसंख्येने रसिक उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
लेखक सुरेश ठाकूर यांचे पुस्तक संवेदनशील 'प्रतिभे'सह 'शब्दांच्या पलिकडे'...!
डॉ. शिल्पा झांटये यांच्या 'द गारलँड ऑफ वर्ड्स' काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन.
राष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेत जि. प. पळसंब पूर्ण प्राथमिक शाळेचे सुयश.
आचरे येथे कथामाला कार्यकर्त्यांचा सत्कार.
आचरे येथे कथामाला कार्यकर्त्यांचा सत्कार.कथ...