ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
डॉ. शिल्पा झांटये यांच्या 'द गारलँड ऑफ वर्ड्स' काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन.  
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

डॉ. शिल्पा झांटये यांच्या 'द गारलँड ऑफ वर्ड्स' काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन. 

डॉ. शिल्पा झांटये यांच्या 'द गारलँड ऑफ वर्ड्स' काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन.

Article image


ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा येथील श्री. रामेश्वर वाचन मंदिर येथे अक्षय तृतीये दिवशी, मालवण येथील प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ. शिल्पा झांटये यांचा निवडक २६ इंग्रजी कवितांच्या संग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला. मुले, शिक्षक, पालक यांना डोळ्यासमोर ठेवून या काव्य संग्रहातील कवितांचे लेखन करण्यात आले असून मालवण मधील शालेय आणि सार्वजनिक ग्रंथालयांना हे पुस्तक वाचनासाठी मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे डॉ. झाटये यांनी सांगितले आहे.


या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला डॉ. शिल्पा झाटये व डॉ. अविनाश झांटये यांच्यासह श्री. रामेश्वर वाचन मंदिराचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापार्डेकर, सदस्या सौ. उर्मिला सांबारी, भिकाजी कदम, श्रीमती वैशाली सांबारी, जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षा सांबारी, सौ. कामिनी ढेकणे, सौ. श्रद्धा महाजनी, निलेश सरजोशी, मंदार सांबारी, श्रीमती सुगंधा गुरव, ग्रंथपाल सौ. विनिता कांबळी, महेश बापार्डेकर, सौ. समृद्धी मेस्त्री, स्वप्नील चव्हाण आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


हे पुस्तक झांटये हॉस्पिटल रेवतळे येथे १५०/_ रुपयात उपलब्ध आहे. ह्या पुस्तकाबद्दल अधिक माहितीसाठी कवयित्री डाॅ. शिल्पा झांटये यांच्याशी 9422393929 क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकतो.


आचरा येथील श्री. देव रामेश्वर यांच्या साक्षीने अक्षय तृतीयेला प्रकाशित झालेल्या ह्या 'द गारलँड ऑफ वर्ड्स' पुस्तकाबद्दल कवयित्री डाॅ. शिल्पा झांटये यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स