राष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेत जि. प. पळसंब पूर्ण प्राथमिक शाळेचे सुयश.
राष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेत जि. प. पळसंब
पूर्ण प्राथमिक शाळेचे सुयश.
मुख्याध्यापक श्री. कदम, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, मुंबईस्थित कलाकर्मी गिरीधर पुजारे व मान्यवरांनी केले अभिनंदन.
ब्यूरो न्यूज : राष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धा तथा 'नॅशनल लेवल आर्ट कॉम्पिटिशन' मधील चित्रकला स्पर्धेत, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब क्रमांक १ शाळेतील विद्यार्थ्यांनी सुयश मिळवले. ही स्पर्धा शाळा पळसंब क्रमांक १ येथे संपन्न झाली .यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेत 'उत्कृष्ट श्रेणी' प्राप्त केली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. कदम तसेच सर्व शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समिती, पालक वर्ग व या शाळेचे माजी विद्यार्थी तथा मुंबईस्थित कलाकर्मी गिरीधर पुजारे, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य नारायण सावंत, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ. जान्हवी प्रमित साईल आदी मान्यवरांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
लेखक सुरेश ठाकूर यांचे पुस्तक संवेदनशील 'प्रतिभे'सह 'शब्दांच्या पलिकडे'...!
डॉ. शिल्पा झांटये यांच्या 'द गारलँड ऑफ वर्ड्स' काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन.
आचरे येथे कथामाला कार्यकर्त्यांचा सत्कार.
आचरे येथे कथामाला कार्यकर्त्यांचा सत्कार.कथ...
आचरे येथे संपूर्ण रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धा उत्साहात.
आचरे येथे संपूर्ण रामरक्षा स्तोत्र पाठांतर स...