ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
आचरे येथे पुस्तक परिचय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

आचरे येथे पुस्तक परिचय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात.

आचरे येथे पुस्तक परिचय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात.   


कोमसाप मालवणच्या वतीने आयोजित आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ कवी रुजारिओ पिंटो, कोमसाप मालवण अध्यक्ष सुरेश ठाकुर आणि मान्यवर तसेच विशेष साहित्यप्रेमी त्रिंबक आजगावकर, कोमसाप सदस्य - कार्यकर्ते व रसिक वाचकांची उपस्थिती.   


कै. विजया भास्कर वालावलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित स्पर्धा.


आचरा : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणने अलिकडेच कोमसापचे संस्थापक व ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या 'करूळचा मुलगा' या आत्मचरित्रावर आधारित परिचय लेख स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ बिडये विद्यामंदिर केंद्र शाळा आचरे क्र. १ येथे संपन्न झाला. ही स्पर्धा कोमसाप मालवणच्या सक्रिय कार्यकर्त्या सुजाता सुनील टिकले यांनी त्यांच्या मातोश्री कै. विजया भास्कर वालावलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेली होती. श्री. सुरेश गांवकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात कोमसाप मालवण अध्यक्ष सुरेश ठाकुर व मान्यवर उपस्थित होते. 

Article image


या स्पर्धेचे परीक्षण सुधाकर वळंजू (पणदूर) यांनी केले होते. स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे आहे.

 

प्रथम : रसिका राजेंद्र तेंडोलकर ( कसाल ), द्वितीय : वंदना नारायण राणे ( कणकवली), तृतीय : रश्मी रामचंद्र आंगणे (ओसरगाव).


उत्तेजनार्थ- श्रद्धा वाळके(मसुरे), महादेव बागडे (आचरा )मोहन गावकर (कोल्हापूर), मधुरा माणगावकर (कणकवली), उज्ज्वला धानजी (कणकवली ), चंद्रशेखर धानजी (कणकवली) , शरयू घाडी (मुणगे- देवगड ).

   

या स्पर्धेतील सहभागी, स्वराशा कासले, आत्माराम नाटेकर, योगेश मुणगेकर, पूर्वा खाडिलकर, तेजल ताम्हणकर,अशोक आठलेकर, आदिती मसूरकर, वैजयंती करंदीकर, दिव्या परब, दिपाली कांदळगावकर, सुगंधा गुरव, देवयानी आजगावकर, ऋतुजा केळकर यांना सुजाता टिकले यांनी अरण्यॠषी मारुती चितमपल्ली यांचा 'रानवाटा' या पुस्तकाची भेट दिली.

    

विजेत्यांना रोख पुरस्कार, सन्मानचिन्ह आणि पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्याकडून आलेला त्यांची स्वाक्षरी असलेला त्यांचा 'स्मृतीजागर' हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.             


यावेळी व्यासपीठावर सुरेश ठाकूर, सुधाकर वळंजू, अशोक कांबळी, सदानंद कांबळी, स्नेहा, नारिंगणेकर, कुमार कांबळे , माधव गावकर उपस्थित होते. 

   

या कार्यक्रमाला ज्येष्ठ कवी रुजारिओ पिंटो, कवयित्री सुनंदा कांबळे, द. शि. हिर्लेकर गुरुजी, बाबाजी भिसळे,प्रकाश पेडणेकर, मंदार सांबारी यांच्यासह कोमसाप मालवणचे सदस्य उपस्थित होते तसेच विठ्ठल लाकम (डोंबिवली ), शरयू घाडी (ठाणे), त्रिंबक आजगावकर (वेंगुर्ला), गोविंद प्रभू ( सावंतवाडी) अशा साहित्यप्रेमींची विशेष उपस्थिती होती. 


या कार्यक्रमाचे आयोजन कोमसाप मालवणच्या कार्यकारी मंडळाने केले होते. अध्यक्ष सुरेश गावकर यांनी सहकार्य व योगदान दिलेल्या सर्वांची प्रशंसा केली. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स