वायरी बांध येथे सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक अजय शिंदे व नूतन नगरसेविका मेघा सावंत गांवकर यांचा सत्कार.
वायरी बांध येथे सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक अजय शिंदे व नूतन नगरसेविका मेघा सावंत गांवकर यांचा सत्कार.
मालवण : श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन, मालवण संचालित डॉ. कुडाळकर हायस्कूल येथील क्रीडा शिक्षक श्री. अजय शिंदे यांची सेवानिवृत्ती तसेच संस्थेच्या सल्लागार श्रीमती मेघा सावंत गावकर यांची मालवण नगर परिषद नगरसेविकापदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार सोहळा संपन्न झाला. श्री क्षेत्र दत्त मंदिर, वायरी बांध, मालवण येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री. विलास झाड यांचा शुभहस्ते दोन्ही मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. कृष्णा बांदेकर, उपाध्यक्ष श्री. भालचंद्र उर्फ बबलू राऊत, खजिनदार श्री. विनायक निवेकर आणि रवींद्र राणे, नामदेव प्रभू, अविनाश पराडकर, मिलिंद झाड, सागर सावंत, देविदास खडपे, देवेन कोळंबकर, सोहम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला डॉ. कुडाळकर हायस्कूल मुख्याध्यापिका
सौ. नंदिनी साटलकर, डॉ कुडाळकर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची परब आणि सौ. अमिता निवेकर, सौ. साटम, सौ. गावकर, सौ. शिंदे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिष्य आणि भक्तवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून चिंदरमध्ये शालेय मुलांना वह्यांचे वाटप
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.