ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
आचरे येथे संपूर्ण रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धा उत्साहात.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

आचरे येथे संपूर्ण रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धा उत्साहात.

आचरे येथे संपूर्ण रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धा उत्साहात. 

Article image


बालदिन व जनजाती गौरव दिनाचे औचित्य. 


आचरा | ब्यूरो न्यूज : बालदिन आणि जनजाती गौरव दिनाचे औचित्य साधून, श्री. रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा यांच्यावतीने बालदिन आणि स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धा संपन्न झाली. ही स्पर्धा, श्री. संजय पाडावे, श्री. अभिजित जोशी, श्रीम. वैशाली सांबारी व श्री. मंदार सरजोशी यांनी प्रायोजित केली. 

Article image


स्पर्धेपूर्वी स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी करताना संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबाजी भिसळे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती देताना हा दिवस जनजाती गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो असे सांगितले.

Article image

   

या कार्यक्रमानिमित्त आचरे गाव व पंचक्रोशीतील इयत्ता ४थी ते ७वी च्या विद्यार्थ्यांची श्री रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धा आयोजित केलेली होती. या स्पर्धेला पंचक्रोशीतील १५ विद्यार्थी सहभागी झाले. 


श्री. रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धेतील विजेते स्पर्धक खालीलप्रमाणे आहेत.


प्रथम क्रमांक : कु.लावण्या स्वप्नील चव्हाण- शाळा आचरे बागजामडूल, द्वितीय क्रमांक - कु.भक्ती करुणाधन जोशी -शाळा आचरे पिरावाडी, तृतीय क्रमांक - कु.अद्वैत कौस्तुभ केळकर- न्यू इंग्लिश स्कूल आचरा.


उत्तेजनार्थ १ - कु.ललित लक्ष्मण गुरव, शाळा ज्ञानदीप विद्यामंदिर वायंगणी, उत्तेजनार्थ २ - कु. मनस्वी प्रदीप चव्हाण - शाळा आचरे पिरावाडी. 

  

या स्पर्धेसाठी श्री. उदय मेहेंदळे, (त्रिंबक) व सौ. उर्मिला सांबारी कार्यकारिणी सदस्या यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.


या कार्यक्रमाला स्पर्धेचे देणगीदार, सर्व कार्यकारिणी सदस्य, सांस्कृतिक समिती सदस्य, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपाध्यक्ष श्री. अशोक कांबळी यांनी केले. आपल्या राष्ट्रागीतास १५० वर्ष पूर्ण झाल्यामुळे राष्ट्रगीताची संपूर्ण माहिती उपाध्यक्ष श्री. अशोक कांबळी यांनी देऊन सामूहीकरित्या 'वंदे मातरम 'या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 


कार्यक्रमाचे निवेदन ग्रंथपाल सौ. विनिता कांबळी यांनी तर नियोजन श्री. महेश बापर्डेकर, सौ. समृद्धी मेस्त्री - बापर्डेकर व श्री. स्वप्नील चव्हाण यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स