ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
आचरे येथे कथामाला कार्यकर्त्यांचा सत्कार.

आचरे येथे कथामाला कार्यकर्त्यांचा सत्कार.

आचरे येथे कथामाला कार्यकर्त्यांचा सत्कार.


कथामाला मालवण अध्यक्ष सुरेश ठाकुर यांचे विशेष संबोधन

Article image


आचरा : अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला मालवण या संस्थेमार्फत मालवण तालुक्यातल्या आचरे येथील बा. ना. बिडये विद्यालय केंद्र शाळा आचरे क्र. १ येथे नुकताच कथामाला कार्यकर्त्या शिक्षकांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष स्थानी सानेगुरूजी कथामाला मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर तर प्रमुख मान्यवर म्हणून श्री अशोक धोंडू कांबळी होते. यावेळी व्यासपीठावर जयप्रकाश परुळेकर (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), अर्पिता घाडी (उपाध्यक्षा, शाळा व्यवस्थापन समिती), अनिता पाटील (मुख्याध्यापिका,आचरे क्र. १), सुगंधा केदार गुरव (कार्यवाह, कथामाला मालवण), सुरेंद्र सकपाळ (उपाध्यक्ष, कथामाला), श्रुती गोगटे (उपाध्यक्षा, कथामाला)तसेच सायली परब, मनाली फाटक, भावना मुणगेकर, कामिनी ढेकणे, नेहा बापट, संजय परब आदी कथामाला कार्यकर्ते उपस्थित होते.

    

यावेळी अनिता पाटील,सिद्धेश हळवे, शारदा बिसेन, दीपाली खंड गावकर , मीरा बांगर यांचा कथामालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे बाबाराव महादवाड यांचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री अशोक कांबळी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

   

यावेळी साने गुरुजी कथामाला मालवण आयोजित कथाकथन स्पर्धा २०२५ मध्ये यशस्वी स्पर्धकांना बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला.

गट क्रमांक १) (१ली /२री ) अनुक्रमे १) विजय गोविंद अमृतवाड , २)युक्ता महेश पुजारे, ३) काव्या प्रथमेश घाडी.


गट क्रमांक २(३री/४थी) अनुक्रमे १) सिद्धी समीर नागले, २) पुर्वा सुरेश पाताडे, ३) आरती विष्णू भाटकर.


गट क्रमांक ३(५वी/६वी) अनुक्रमे 

१) चिराग केशव सामंत, २) ज्ञानेश्वरी मिलिंद मेस्त्री, ३) विराज संजय जावीर .

या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

यावेळी कथामाला, मालवण अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुरेश ठाकूर यांनी त्यांच्या विशेष संबोधनात ,कथामालेच्या कार्याचा आढावा घेतला आणि त्यासाठी आचरे केंद्रशाळेचे योगदान स्पष्ट केले. श्री. ठाकूर यांनी या शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या सर्वांविषयी विशेष कृतज्ञता व्यक्त केली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुगंधा केदार गुरव यांनी केले तर मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स