ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
वायरीबांध येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

वायरीबांध येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

प्रकाशन: 17 Dec 2025 07:11 AM
वाचन संख्या 75

वायरीबांध येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. 


परमपूज्य श्री सद्गुरु सदानंद माऊली महाराज ध्यानमंदिर वर्धापन दिन सोहळा तसेच कुमारिका पूजन. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : श्री सद्गुरु सदानंद माऊली महाराज संप्रदाय, मालवण यांच्या वतीने श्री क्षेत्र दत्तमंदिर, वायरीबांध मालवण येथे परमपूज्य श्री सद्गुरु सदानंद माऊली महाराज ध्यानमंदिर वर्धापन दिन सोहळा तसेच कुमारिका पूजन सोहळा गुरुवार, १८ डिसेंबर व मंगळवार, २३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. हे दोन्ही धार्मिक कार्यक्रम संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष श्री. विलास (बापूजी) झाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहेत.


वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त गुरुवार, १८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता परमपूज्य श्री सद्गुरु सदानंद माऊली महाराज यांच्या निर्गुण पादुकांवर लघुरुद्राभिषेक होणार आहे. त्यानंतर दुपारी १२:३० वाजता मध्याह्न आरती व दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७:३० वाजता संप्रदायिक भजनाचा कार्यक्रम होणार आहे.


तसेच मंगळवार, २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता घटस्थापना व कुमारिका पूजन सोहळा संपन्न होणार आहे. दुपारी १ वाजता महाप्रसाद तर सायंकाळी ७:३० वाजता संप्रदायिक भजन आयोजित करण्यात आले आहे.


या दोन्ही दिवशी होणाऱ्या धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन माऊली परिवाराचे कार्याध्यक्ष श्री. बांदेकर यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...

11 Aug 2026 281

लोकप्रिय टॅग्स