ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयाच्या संस्थापक अध्यक्ष रेखाताई गायकवाड यांचा गौरव.

माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयाच्या संस्थापक अध्यक्ष रेखाताई गायकवाड यांचा गौरव.

माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयाच्या संस्थापक अध्यक्ष रेखाताई गायकवाड यांचा गौरव. 

Article image


आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सावंतवाडी तालुका संघटनेच्या वतीने सन्मान. 


कणकवली | ब्यूरो न्यूज : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सावंतवाडी तालुका संघटनेच्या वतीने माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय आरोस- दांडेली, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती रेखाताई गायकवाड यांचा संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.

Article image


यावेळी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, जिल्हा उपाध्यक्ष तन्वीर खतीब, जिल्हा महिला संघटक सौ. शिवानी पाटकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष सोहन शारबिंद्रे, कार्याध्यक्ष सौ. मोहिनी मडगावकर, सह सचिव नितीन नाईक, सावंतवाडी तालुका महिला संघटक सौ. रेश्मा परब, उद्योजक महेंद्र चव्हाण, सौ. पूजा नाईक, सानिका मडगावकर, सौ. सुमेधा मडगावकर, डॉ. सौ. अर्चना चव्हाण तसेच विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.


यावेळी या विद्यालयातील कर्णबधिर व मूकबधिर ७० विद्यार्थ्यांना संघटनेच्या वतीने ब्लँकेट व खाऊ वाटप करण्यात आले. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स