ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांना कोकणरत्न पदवी पुरस्कार जाहीर.

ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांना कोकणरत्न पदवी पुरस्कार जाहीर.

ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांना कोकणरत्न पदवी पुरस्कार जाहीर. 

Article image

 

मुंबईत १३ डिसेंबरला पुरस्कार प्रदान समारंभ.


ब्यूरो न्यूज : स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे मालवण मधील ॲड. ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांना कोकणरत्न पदवी पुरस्कार जाहीर करण्यात आला. सामाजिक, युवा सक्षमीकरण, शैक्षणिक आणि पर्यावरण संवर्धन अशा विविध क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाल्याचे समजते आहे. या पुरस्काराची घोषणा स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 


कोकणरत्न पदवी प्रदान सोहळा शनिवार, १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदाना जवळ, मुंबई येथे संपन्न होईल. 


'कोकणरत्न' पदवी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स