ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
ओझर विद्यामंदिरमध्ये प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर संपन्न.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

ओझर विद्यामंदिरमध्ये प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर संपन्न.

ओझर विद्यामंदिरमध्ये प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर संपन्न.

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर प्रशालेमध्ये प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. फायर ॲण्ड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबईचे ट्रेनर संजय मेस्त्री यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रथमोपचार या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.


प्रथमोपचार करणाऱ्या व्यक्तीकडे असावयास असणारे गुण, प्रथमोपचार करण्याचे उद्देश, बँडेजचे प्रकार व बँडेज बांधण्याच्या पद्धती, रक्त थांबवण्यासाठी जखमेवर करावयाचे प्रथमोपचार, फ्रॅक्चरचे प्रकार व फ्रॅक्चर झालेल्या व्यक्तींना हाताळावयाच्या विविध पद्धती, त्वचा भाजल्यावर करावयाचे प्रथमोपचार, व्यक्तीला चक्कर आल्यावर किंवा बेशुद्ध पडल्यावर करावयाचे उपाय, हृदयविकाराचा झटका आल्यावर तातडीने करावयाचे उपचार व त्या व्यक्तीला सी. पी. आर. द्यावयाची पद्धती, साप, प्राणी अथवा कीटकांच्या दंशामुळे विषबाधा झाल्यास करावयाचे उपाय, विष प्रयोग झाल्यास करावयाचे उपाय, कोणतेही साधन नसताना जखमींना वाहून नेण्याच्या पद्धती इत्यादी विषयांवर मार्गदर्शक संजय मेस्त्री यांनी प्रात्यक्षिकांसह पी.पी.टी. व व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रात्यक्षिकांमध्ये विद्यार्थी व शिक्षकही सहभागी झाले होते. 


या शिबिरामुळे ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराबद्दल सखोल माहिती मिळून प्रशालेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी हे शिबिर लाभदायक ठरले. प्रथमोपचाराचे विना मोबदला प्रशिक्षण दिल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी मार्गदर्शक संजय मेस्त्री यांचे प्रशालेच्या वतीने आभार मानले.


या शिबिरासाठी प्रशालेचे विद्यार्थी तसेच शिक्षक ए.ए.शेर्लेकर, पी.के.राणे, एस.जे.सावंत, पी. आर पारकर, एस.पी.पवार, विजय नातू व शिक्षकेतर कर्मचारी आर.जे.जाधव, पी.व्ही.खोडके, एम.डी.परूळेकर आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स