ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
चौके येथील भराडी देवी मंदिर परिसराची श्रमदानातून स्वच्छता.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

चौके येथील भराडी देवी मंदिर परिसराची श्रमदानातून स्वच्छता.

चौके येथील भराडी देवी मंदिर परिसराची श्रमदानातून स्वच्छता. 

Article image


ग्रामपंचायत, देवस्थान कमिटी व ग्रामस्थांचा सहभाग. 


मालवण | ब्यूरो न्यूज : शासनाच्या स्वच्छोत्सव उपक्रमांतर्गत मंदिर परिसराची श्रमदानातून स्वच्छता करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून ग्रामपंचायतींना प्राप्त सूचनेनुसार चौके ग्रामपंचायतीच्या वतीने चौके येथील श्री देवी भराडी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या शिबिरात ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, देवस्थान कमिटी पदाधिकारी, प्रतिष्ठित व्यक्ती व ग्रामस्थ आणि सेवाभावी संस्था यांच्या श्रमदानातून मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला.


सिंधुदुर्ग जिल्हा हा स्वच्छ व पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मंदिर परिसर, देवस्थाने, धार्मिक स्थळे येथेही पर्यटक व भाविक भेट देतात. यातून मंदिर परिसरामध्ये कचरा प्लास्टिक कागद, कोरडे गवत, पान फुलांचे अवशेष इत्यादींचा साठा वाढत जातो. अशा परिस्थितीत पर्यावरणीय स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, सौंदर्यकरण तसेच धार्मिक पावित्र्य या सर्व दृष्टीने मंदिर परिसर स्वच्छ आणि पवित्र राहणे केवळ धार्मिकदृष्ट्यात नव्हे तर समाज आरोग्य, पर्यटन विकास आणि ग्रामविकासाच्या दृष्टीकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे असल्याने मंदिर परिसर स्वच्छतेच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार चौके ग्रामपंचायतीतर्फे भराडी भराडी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 


यावेळी चौके सरपंच पी.के. चौकेकर ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष नितीन गावडे, देवस्थान कमिटीचे पदाधिकारी पत्रकार संतोष गावडे, बिजेंद्र गावडे, दत्ता गावडे,ग्रामपंचायत सदस्य दुलाजी चौकेकर, आशा स्वयंसेविका सौ. सिद्धाली गावडे, माजी सरपंच सचिन आंबेरकर, माजी सरपंच मधुकर चौकेकर, ग्रामपंचायत अधिकारी सरमळकर, महेश सावंत, अनिकेत घोगळे उदय गावडे, रामचंद्र बुधाजी चौकेकर, अनंत चौकेकर, नामदेव चौकेकर, शिवाजी गावडे, हरिश्चंद्र गावडे, संजय गावडे, संजय गावडे, ग्रामपंचायत कर्मचारी आनंद सावंत, दीपक चौकेकर, गोपी मांजरेकर, गुरूप्रसाद गावडे आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स