ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
भंडारी हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भंडारी हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.

भंडारी हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.



Article image


 



मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमध्ये २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योग अभ्यासक व प्रशिक्षक सौ. दीपा वणकुद्रे आणि सहकारी कुमारी पूजा वणकुद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके केली.


यावेळी दीपा वनकुद्रे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून दिले. सध्याच्या स्पर्धेच्या व ताणतणावाच्या काळात विद्यार्थ्यांनी नियमित योगा केल्यास मन शांत राहण्यास तसेच शरीर निरोगी राहण्यास मदत होईल, असे दीपा वनकुद्रे यांनी सांगितले. यावेळी विविध प्रकारच्या योगासनांची प्रात्यक्षिके करण्यात आली.


यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे, शिक्षक आर. बी. देसाई, सौ. सरोज बांदेकर, एस. ए. अवसरे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स