ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रस्त्यावर सापडलेले पैशाचे पाकीट प्रामाणिक तरुणाने परत केले.

रस्त्यावर सापडलेले पैशाचे पाकीट प्रामाणिक तरुणाने परत केले.

प्रकाशन: 09 Dec 2025 09:28 PM
वाचन संख्या 130

रस्त्यावर सापडलेले पैशाचे पाकीट प्रामाणिक तरुणाने परत केले.

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण वायरी येथील 'रेकोबा घाटी' रस्त्यावर सापडलेले १० हजार रुपये असलेले पाकीट गावातील निखिल तळगावकर या प्रामाणिक तरुणाने त्या पाकिटाच्या मालकास परत केले.


रेकोबा घाटी रस्त्यावर एक पैशाचे पाकीट निखिल तळगावकर यांना आढळले. पाकिटात १० हजार रुपये असल्याचे दिसताच निखिल यांनी तत्काळ हे पाकीट, सामाजिक कार्यकर्ते संतोष लुडबे यांच्याकडे सुपूर्द केले. चौकशी नंतर सदर पाकीट निलेश गोपाळ वालावलकर (मुळगाव पेंडूर, सध्या वास्तव्य वायरी) यांचे असल्याचे निष्पन्न झाले. सेंटरिंगचे काम करणाऱ्या निलेश यांनी सेकंड हँड रिक्षा खरेदी करण्यासाठी उसने आणलेली रक्कम या पाकिटात ठेवली होती. पैशांचे पाकीट हरवल्यामुळे ते चिंताग्रस्त झाले होते; मात्र निखिल यांच्या प्रामाणिकपणामुळे संपूर्ण रक्कम सुरक्षित परत मिळाली. निखिल तळगांवकर यांच्या या कार्याचे श्री. संतोष लुडबे, श्री. सतीश भगत यांच्यासह ग्रामस्थांनी कौतुक केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 444

लोकप्रिय टॅग्स