ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मळगाव इंग्लिश स्कूलचा २८ डिसेंबर रोजी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा.

मळगाव इंग्लिश स्कूलचा २८ डिसेंबर रोजी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा.

मळगाव इंग्लिश स्कूलचा २८ डिसेंबर रोजी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा.


मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवारातर्फे आयोजन.


सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवारातर्फे मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे रविवार २८ डिसेंबर रोजी, सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत भव्य माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा प्रशालेच्या प्रांगणात आयोजीत होत आहे.


स्नेहमेळाव्याची सुरुवात सकाळी ९ वाजता उपस्थिती नोंदवून होणार आहे. त्यानंतर दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन, स्वागतपर भाषण, माजी विद्यार्थ्यांचे मुक्त संवाद सत्र, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा गौरव - सत्कार आणि स्नेहभोजन असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.


सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात मळगाव इंग्लिश स्कूलच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि शालेय जीवनातीलआठवणींची उजळणी करण्याची ही संधी गमावू नये, असे आवाहन माजी विद्यार्थी परिवारातर्फे करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

युवा नेते विशाल परब यांच्या वतीने धाकोरे क्र. १ शाळेत शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

युवा नेते विशाल परब यांच्या वतीने धाकोरे क्र. १ शाळेत शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.

युवा नेते विशाल परब यांच्या वतीने धाकोरे क्र. ...

14 Jul 2026 276

लोकप्रिय टॅग्स