ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
मिलाग्रीस प्रशालेमध्ये फॅन्सी ड्रेस उपक्रम उत्साहात.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मिलाग्रीस प्रशालेमध्ये फॅन्सी ड्रेस उपक्रम उत्साहात.

मिलाग्रीस प्रशालेमध्ये फॅन्सी ड्रेस उपक्रम उत्साहात. 


सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सावंतवाडी येथील मिलाग्रीस प्रशालेमध्ये फॅन्सी ड्रेस उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये मराठी प्रायमरी, इंग्लिश प्रायमरी व हायस्कूलमधील १२० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 

Article image


विविध धर्मांमधील संत, महान व्यक्ती यांच्या वेशभूषेतून 'सर्वधर्मसमभावाची संकल्पना' रुजवीत विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतला. विविध धर्मातील संतांची वेशभूषा तसेच त्यांनी समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी स्वीकारलेली विचारधारा या अनुषंगाने उपक्रमामध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी संतांचे विचारही या वेशभूषा अंतर्गत सादर केले.


यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक रे. फादर रिचर्ड सालदान्हा, पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर, इंग्लिश प्रायमरी पर्यवेक्षिका क्लीटा परेरा, मराठी प्रायमरी मुख्याध्यापिका सिस्टर कविता चांदी आदी उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक रे. फादर रिचर्ड सालदान्हा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले अशी माहिती मिळत आहे. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे योगदान व सहकार्य लाभले.


या उपक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निलराज सावंत यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

युवा नेते विशाल परब यांच्या वतीने धाकोरे क्र. १ शाळेत शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

युवा नेते विशाल परब यांच्या वतीने धाकोरे क्र. १ शाळेत शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.

युवा नेते विशाल परब यांच्या वतीने धाकोरे क्र. ...

14 Jul 2026 267

लोकप्रिय टॅग्स