ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा.

न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा.


सावंतवाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या न्हावेली येथील गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा गुरु अभिवादन सोहळा रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी श्री भगवती हॉल, मळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. संगीत क्षेत्रातील गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात विविध सांगीतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. 


या सोहळ्याला सावंतवाडी संस्थांनचे राजगुरू तथा तळवणे मठाधिपती राजेंद्रस्वामी भारती महाराज यांचे आशीर्वाद लाभणार आहेत, तसेच या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उदघाटक म्हणून उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, विशेष अतिथी महाराष्ट्र महसूल व वन मंत्रालय उपसचिव शांतराम कुदळे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) शारदा पोवार, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) प्रतिभा बराळे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) आरती देसाई, सावंतवाडी उपविभागीय अधिकारी वीरसिंह वसावे उपस्थित राहणार आहेत.


गुरु अभिवादन सोहळ्यानिमित्त सकाळी ९.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. त्यानंतर १०.०० वाजता गुरुकुल संगीतशिक्षण संस्थेचे विद्यार्थी जय जगदीश हरे प्रार्थना सादर करणार आहेत. १०.३० ते १२.०० वाजता विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शास्त्रीय गायन, १२.०० ते १२.३० वाजता गुरुवर्य भावेश राणे यांच्या विद्यार्थ्यांची पखवाज जुगलबंदी, १२.३० ते १.०० वाजता संगीत अलंकार गुरुवर्य दिप्तेश मेस्त्री यांचे सुश्राव्य गायन सादर होणार आहे. दुपारी १.०० ते २.०० वाजता स्नेहभोजन, २.०० ते ४.०० वाजता विद्यार्थ्यांचे सुश्राव्य भजन गायन, सायंकाळी ४.०० वाजता या कार्यक्रमाचा मुख्य केंद्रबिंदू असलेला गुरुपूजन सोहळा पार पडणार आहे. ५.३० वाजता विद्यालयातील ज्येष्ठ विद्यार्थ्यांचे भैरवी गायन आणि सांगता आदी कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. विद्यार्थी, संगीतप्रेमी, पालक व हितचिंतकांनी या मंगल सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचे संचालक गुरुवर्य दिप्तेश मेस्त्री यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स