युवा नेते विशाल परब यांच्या वतीने धाकोरे क्र. १ शाळेत शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.
युवा नेते विशाल परब यांच्या वतीने धाकोरे क्र. १ शाळेत शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.
ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हा युवा भाजप नेते विशाल परब यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, धाकोरे क्र. १ येथे विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व वह्यांचे मोफत वितरण करण्यात आले. तसेच अंगणवाडीतील सर्व बालकांनाही दप्तरांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाला ओमकार प्रभू आजगावकर, गोविंद साटेलकर, गिरीश परब, महेश कोठावळे, राजू साटेलकर, संदीप मुळीक आणि दीपक मुळीक यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर तळणकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक सोनल जाधव यांनी केले. यावेळी उपशिक्षिका श्रीमती सुजाता गाड, स्वयंसेविका कु. दिव्या काकतकर, अंगणवाडी सेविका श्रीमती साटेलकर तसेच मदतनीस श्रीमती मुळे आदि उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)