ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वराडकर महाविद्यालयाच्या एन. एस. एस. विभाग साप्ताहिक श्रम संस्कार शिबिराचा गोळवण येथे शुभारंभ.

वराडकर महाविद्यालयाच्या एन. एस. एस. विभाग साप्ताहिक श्रम संस्कार शिबिराचा गोळवण येथे शुभारंभ.

प्रकाशन: 07 Dec 2025 04:40 PM
वाचन संख्या 215

वराडकर महाविद्यालयाच्या एन. एस. एस. विभाग साप्ताहिक श्रम संस्कार शिबिराचा गोळवण येथे शुभारंभ.

Article image


प्रा. लेफ्टनंट मल्लेश खोत यांच्या हस्ते उद्घाटन. 


मालवण : सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथील प्रा. लेफ्टनंट एम. आर. खोत यांच्या हस्ते, मालवण गोळवण येथे, वराडकर महाविद्यालय, कट्टा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्य् विद्यार्थ्यांसाठीच्या साप्ताहिक श्रमसंस्कार शिबिराचा शुभारंभ करण्यात आला आहे. कट्टा पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सात दिवसीय विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन झाले आहे. हे शिबीर महाविद्यालय दत्तक गाव गोळवण येथील ग्रामपंचायत- गोळवण - कुमामे - डिकवल येथे ६ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीत संपन्न होत आहे.

Article image


या प्रसंगी विचार मंचावर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा चे अध्यक्ष अजयराज वराडकर, संस्था सचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील नाईक, संस्था सहसचिव साबाजी गावडे, महाविद्यालय विकास समिती सदस्या व स्मिता कॉम्प्युटर एज्युकेशन कट्टा संचालिका सौ श्रद्धा नाईक, गोळवण - कुमामे - डिकवल ग्रामपंचायत चे सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, ग्रामविकास अधिकारी प्रियांका मनवर, सारा ऍग्रो फॉर्म चे मालक सुरेश सावंत, माजी सैनिक सत्यविजय पालव, सामाजिक कार्यकर्ते नंदु नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डी. व्ही. मिराशी, उपप्राचार्य रविंद्र गावडे, एन.एस. एस कार्यक्रम अधिकारी श्री. मिलिंद कदम, कु. सिद्धी नेरुरकर. कु. श्रुती कुंभार, विद्यार्थी प्रतिनिधी कु. विद्येश बाईत, कु भक्ती घाडी तसेच जिल्हा एन. एस एस कोऑर्डिनेटर सय्यद उपस्थित होते.

Article image

( उद्घाटक : प्राध्यापक लेफ्टनंट एम. आर. खोत)


यावेळी प्राध्यापक खोत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्ती, एन. एस. एस. हा विभागाची उद्दिष्ट्ये यांची माहिती त्यांनी दिली. या शिबिराबद्दल संस्था पदाधिकारी , कॉलेजचे प्राचार्य ध्वजेद्र मिराशी, उपप्राचार्य रवींद्र गावडे, आणि संबंधित सर्वांची प्रशंसा केली . स्वच्छता, रक्तदान ,मतदान जागृती, आपत्ती काळात मदत, वृक्षारोपण असे यासारखे अनेक सामाजिक उपक्रम एन. एस. एस मध्ये राबविले जातात त्यामुळे विद्यार्थी आणि समाज यांच्यातील दुवा मजबूत होतो असेही प्रा. लेफ्टनंट एम. आर. खोत यांनी स्पष्ट केले.


कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, गोळवण - कुमामे - डिकवल गावचे सरपंच श्री सुभाष लाड यांनी आपल्या मनोगतातून एन. एस एस शिबिरातील सहभागी स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या.

निवासी शिबिरातून एन .एस. एस. स्वयंसेवकामध्ये नेतृत्व गुण विकसित होतात, सामाजिक बांधिलकी वाढीस लागते असे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष व कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ चे सचिव सुनिल नाईक यांनी व्यक्त केले. कॉलेज प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी यांनी भविष्यकालीन वाटचालीसाठी एन. एस. एस चे महत्त्व समजावून सांगितले. उपप्राचार्य रवींद्र गावडे यांनी शिबिराची पूर्वतयारी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेली आहे असे सांगितले. शिबिराचे सर्व नियोजन रवींद्र गावडे आणि कदम यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे असेही सांगण्यात आले. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी मिलिंद कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन एन. एस. एस कार्यक्रम अधिकारी कु. सिद्धी नेरुरकर यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स