ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मालवणात 'भक्तीरंग' उत्साहात.

मालवणात 'भक्तीरंग' उत्साहात.

मालवणात 'भक्तीरंग' उत्साहात. 

Article image


दत्त मंदिर, भरड येथे संपन्न कार्यक्रमात श्रृंगारमणी गुरू रागेश्री पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली मानसी पराडकर व सायली वाळके यांचे विशेष भरतनाट्यम् सादरीकरण.

Article image



मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या भरड दत्त मंदिर प्रांगणातील मंचावर 'भक्तीरंग' कार्यक्रम उत्साहात सादर झाला. ६ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी सादर झालेल्या कार्यक्रमात भरतनाट्यम आणि मराठी भक्तिगीतांचा संगम अशा एक कलात्मक परंपरेचा भरतनाट्यम् या नृत्याविष्कारातून जागर करण्यात आला. छत्रपती सरफोजीराजे भोसले यांच्या काळात मराठी भरतनाट्यमची परंपरा निर्माण झाली होती. मालवण तालुक्यातील गुरामवाडचे मूलनिवासी आणि जागतिक कीर्तीचे गुरु आचार्य पार्वतीकुमार यांनी आपल्या छत्रपती सरफरोजीराजे यांच्या रचनां अभ्यासपूर्वक पुन्हा रसिकांसमोर आणल्या. भरतनाट्यम् मार्गदर्शक श्रृंगारमणी रागेश्री पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायली वाळके व मानसी पराडकर यांनी भक्तीरंग ह्या नृत्याधिष्ठित कार्यक्रमाचे सादरीकरण केले. 

Article image


मालवण ते तंजावर आणि प्रचीन पारंपरिक तमिळ भरतनाट्यम ते छत्रपती सरफरोजीराजे भोसले कृत अर्वाचीन मराठी भरतनाट्यम व्हाया गुरू पार्वतीकुमार म्हणजेच कैलासवासी गजानन महादेव कांबळी अशा चालत आलेल्या अनोख्या पारंपरिक तंत्रशुध्द शास्त्रीय सादरीकरणाला मालवणच्या रसिकानी उत्फूर्त प्रतिसाद दिला. 


या कार्यक्रमाचा शुभारंभ, श्री नटराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व श्री दत्त महाराजाना वंदन करुन करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक नितीन वाळके यांनी प्रास्ताविकात उपस्थित सर्वांना या कार्यक्रमामागची भरतनाट्यम् व 'कलाविष्कारांचा संगम' ही संकल्पना स्पष्ट केली. डाॅ. गार्गी ओरसकर यांनी उपस्थित मान्यवर, सादरकर्ते व रसिकांचे स्वागत केले.


श्लोकांजलीने मुख्य सादरीकरणाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर नटराज कौतुकम, अलारिप्पु, अभिनयपद, नृत्यपद, किर्तनम, मधुराष्टकम, तिलना अशी भरतनाट्यम नृत्याविष्कारातील विविध नृत्य सादर करण्यात आली. 


'मला हे दत्त गुरू दिसले' या मराठी दत्त स्तवन गीतावर सादर करण्यात आलेला भरतनाट्यम् नृत्याविष्कार विशेष प्रशंसेचा ठरला. 


ह्या कार्यक्रमाला मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, उद्योजक सौ. स्मृती कांदळगांवकर, ज्येष्ठ पुरस्कार प्राप्त कवी तसेच शिवाजी वाचन मंदिरचे पदाधिकारी उद्योजक रुजारिओ पिंटो, उद्योजक सुरेखा वाळके, ज्येष्ठ व्यावसायिक सुहास ओरसकर, कलावंत आणि व्यावसायिक उमेश सांगोडकर, गौरव ओरसकर तसेच श्री दत्त मंदिर, भरडचे विश्वस्त, कार्यकर्ते, भाविक व रसिक उपस्थित होते. 

Article image

Article image

Article image


भक्तीरंग कार्यक्रम चैतन्य अस्सल मालवणी हाॅटेलच्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात आला. चैतन्य अस्सल मालवणी हाॅटेल व मालवणवासियांच्या वतीने उद्योजक सुरेखा वाळके यांनी भक्तीरंग कार्यक्रमाची संकल्पक व दिग्दर्शक रागेश्री पारकर आणि सादरकर्त्या मानसी पराडकर व सायली वाळके यांचा स्वागत सत्कार केला.

Article image

( उद्योजक नितीन वाळके व सूत्रसंचालक डाॅ. गार्गी ओरसकर)

Article image


गरीमा काजरेकर यांनी आभार प्रदर्शन केले.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स