समता परिषद मुंबई सेवा प्रकल्पाचे मुंबई शिवाजी पार्क येथे उद्घाटन.
समता परिषद मुंबई सेवा प्रकल्पाचे मुंबई शिवाजी पार्क येथे उद्घाटन.
समता परिषद मुंबई अध्यक्ष विजय (भाई) गिरकर यांच्या मार्गदर्शनाखालील प्रकल्पाचे ४१ वे वर्ष.
मसुरे | प्रतिनिधी : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही समता परिषद मुंबईतर्फे सेवा प्रकल्पाचे ४ डिसेंबर सायंकाळी ०५.०० वाजता शिवाजी पार्क येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. चैत्यभूमी, दादर चौपाटी येथे देशभरातून व विदेशातून लाखो अनुयायी व बौद्ध भिक्खू, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात. गेली ४१ वर्षे समता परिषद मुंबईतर्फे या अनुयायांना व बौद्ध भिक्खूंन अन्नसेवा सातत्याने पुरवली जाते.
समता परिषद मुंबई अध्यक्ष व माजी मंत्री विजय (भाई) गिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ४१ वर्ष हा सेवा प्रकल्प यशस्वीपणे राबविला जात आहे.
या सेवा प्रकल्पाचे उद्घाटन मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम, महाराष्ट्राचे मंत्री मा. ना. आशिष शेलार, मा. ना. प्रवीण दरेकर, रा. स्व. संघ मुंबई कार्यवाह विलास भागवत, पत्रकार श्री. किरण शेलार ,भाजप प्रवक्ते नवनाथ बन, भाजप महामंत्री राजेश शिरवाडकर, कुणाल कांबळे, समता परिषद मुंबई चे कार्याध्यक्ष अशोक कांबळे, शरद कांबळे, मयूर देवळेकर,योजना ठोकळे, समिता कांबळे, ज्योती श्रेष्ठी, जयश्री खरात, रवींद्र लाखन, विजय भाऊ पवार ,गुलाब कांबळे, उदय पडेलकर, संजय अढंगळे, सुभाष कांबळे, संजय साळवे, विनोद कांबळे, सिद्धार्थ सकपाळ, सुभाष धोत्रे, दिनकर पवार , प्राध्यापक पवार आणि शेकडो समता परिषद मुंबईचे महिला व पुरुष कार्यकर्ते अविरत सेवा देत आहेत.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...