ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
उपमुख्यमंत्री व मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेची जाहीर सभा संपन्न.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

उपमुख्यमंत्री व मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेची जाहीर सभा संपन्न.

प्रकाशन: 30 Nov 2025 10:39 PM
वाचन संख्या 1020

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेची जाहीर सभा संपन्न. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : कोणी कितीही लावा शक्ती मात्र मालवण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि यापुढेही राहील. विकासाची तळमळ असणारे शिवसेनेचे खणखणीत नाणे आमदार निलेश राणे यांच्या रुपाने या मतदारसंघाला लाभले आहेत. निलेश राणे मागतील तेवढा विकासनिधी मालवण नगरपरिषदेला आणि या मतदारसंघाला उपलब्ध करून देणार. मालवणच्या भविष्याचा फैसला करणारी ही होणारी निवडणूक आहे. तुमचे एक मत मालवण शहाराचे भविष्य घडवणार. मालवणवासियांनी शिवसेनेची भगवी लाट आणत शिवसेना नगराध्यक्षा उमेदवार सौ. ममता वराडकर यांसह शिवसेना नगरसेवक, नगरसेविका उमेदवार यांना बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मालवण येथे जाहीर सभेत बोलताना केले.


मालवण टोपीवाला हायस्कुल पटांगण येथे जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादात जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, माजी आमदार राजन तेली, बाळा चिंदरकर, जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर, वसंत गावकर, देवयानी शिर्सेकर, महेश सारंग, पूजा मांजरेकर, दिपक पाटकर, निना मुंबरकर, सिध्दार्थ जाधव, पूनम चव्हाण, विलास मुणगेकर, नंदीता वरवडेकर, सहदेव बापर्डेकर, अश्विनी कांदळकर, नरेश हुले, मेघा गावकर, राजन परुळेकर, शर्वरी पाटकर, महेश कोयंडे, प्रमिला मोरजे, सीताराम लुडबे, भाग्यश्री मयेकर यांसह शिवसेना पदाधिकारी महिला जिल्हा प्रमुख दिपलक्ष्मी पडते, दादा साईल, राजन सरमळकर, विजय चव्हाण, बबन शिंदे, उमेश नेरुरकर, परशुराम पाटकर, राजा गावकर, जॉन नऱ्होना, काका कुडाळकर, संजय पडते, आनंद शिरवलकर, विनायक बाईत, राजा गावडे, विश्वास गावकर, जॉन नरोना, विनायक राणे, मनोज राणे, शेखर गाड, प्राजक्ता शिरवलकर, संग्राम साळसकर, मधुरा तुळसकर, भाई मांजरेकर, राजू बिडये, अभय कदम, राजेश पारकर, निकीत वराडकर, जाबीर खान, निशय पायेकर, अखिलेश शिंदे, सुरज बिरमोळे यांसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना आणि आताही कार्यकर्ता म्हणून काम करतो. अनेक जनहिताचे निर्णय घेतले. मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण यासह मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माझी सर्वात आवडती योजना आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. असे सांगत लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ आणि तमाम जनता आपल्या पाठीशी आहेत. लाडक्या बहिणींना मला लखपती करायचे आहे. ग्रामीण भागाप्रमाणे शहरातील बचत गट यांसाठी भांडवल उभारून देणार असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणले.


मालवण शहाराचा सर्वांगीण विकास हेच आपले लक्ष राहील. नगरविकास खाते आणि पर्यटन खाते या माध्यमातून मोठा निधी मालवण शहराला विकासासाठी व पर्यटन वाढीसाठी उपलब्ध करून देणार. विकासातून मालवणचा कायापालट करणार असा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देताना शिवसेनेच्या सर्व नगरसेवक उमेदवार यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.


आमदार निलेश राणे हे विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी रहा. सर्व शिवसेना उमेदवारांना विजयी करून शिवसेनेचा भगवा फडकवूया, असे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले.


आमदार निलेश राणे म्हणाले, २१ व्या शतकातील मालवण शहर हेच माझे लक्ष आहे. मालवण कुडाळ मधील मागील दहा वर्षातील विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. शिंदे साहेब यांच्या नगरविकासच्या माध्यमातून मोठया प्रमाणात निधी आणणार. शिंदे साहेबांकडे मागणी केली की विकास निधी मिळणार ही गॅरंटी आहे. मालवण शहरासाठी आमचे व्हिजन आहे. आमचे उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे आहेत. पारदर्शक कारभार ही शपथ घेणारे आमचे उमेदवार आहेत. मी शिंदे साहेबांना शब्द देतो ३ डिसेंबरला शिवसेनेचा भगवा फडकणार. साहेब तुम्हाला बघून तुमच्या कामामुळे ऊर्जा मिळते. दहा वर्षानंतर तुम्ही संधी दिली. जे बोलतात ते करून दाखवतात हे शिंदे साहेब. त्यांना अपेक्षित काम मतदार संघात करून त्यांना गर्व वाटेल असे काम करणार. एकदा संधी द्या तुम्हाला गर्व वाटेल असे काम शिवसेना म्हणून करणार हे सांगितले आणि करण्याचा प्रयत्न करतं आहे. आहे तिथे १००% राहणार. शेवटच्या श्वासा पर्यत शिंदे साहेब यांच्या सोबत राहणार. असे सांगत आमदार निलेश राणे पुढे म्हणाले सिंधुदुर्ग जनतेने आम्हाला भरभरून दिले. मतदार संघ राणे साहेबांनी जपला यापुढे शिवसेना आणि शिंदे साहेब यांच्या ही माध्यमातून आम्ही हा मतदार संघ आम्ही जपणार. गतिमान विकासातून हा मतदारसंघ आदर्श असा मतदारसंघ बनवणार. जनतेचीच सेवा करायची आहे. मालवण शहाराच्या विकासासाठी आमच्या नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक उमेदवारांना विजयी करा. भ्रष्टाचार मुक्त कारभार मालवण पालिकेत दिसेल, असे आमदार निलेश राणे म्हणाले. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मतदार संघ विकासात मोठे सहकार्य लाभत आहे. तसेच संघटना वाढ मध्ये जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचेही योगदान मोठे आहे. विजयात त्यांचेही योगदान मोठे असेल. ३ तारीखला विरोधकांचे टांगे पलटी होतील. शिवसेनेचा विजय निश्चित आहे, असेही आमदार निलेश राणे म्हणाले.


निलेश राणे शिवसेनेची भगवी रेष आहेत. कोकणातील शिवसेनेचा हिरा आहेत. "इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा" असे म्हणत त्यांनी निलेश राणे यांना शिवसेनेचे 'खणखणीत नाणे' आणि 'बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेमधील महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे सांगितले. निलेश राणे हे पक्षासाठी व मतदारांसाठी 'जिवाचं रान' करणारे कार्यकर्ते आहेत, असा गौरव त्यांनी केला. निलेश राणे यांच्यासारखा आमदार मालवणकरांना मिळाला आहे, जो मतदार संघासाठी तळमळीने काम करतो. त्यांच्या मागे एकनाथ शिंदे आहेत. निलेश राणे मागतील तेवढा विकासनिधी मालवण शहाराला देणार असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स