ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
चिंदर गावातील श्री भगवती माऊलीचा यात्रोत्सव 'दिंडे जत्रा' ४ डिसेंबर पासून.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

चिंदर गावातील श्री भगवती माऊलीचा यात्रोत्सव 'दिंडे जत्रा' ४ डिसेंबर पासून.

चिंदर गावातील श्री भगवती माऊलीचा यात्रोत्सव दिंडे जत्रा ४ डिसेंबर पासून. 

Article image

बारापाच मानकरी व श्री देवी भगवती माऊली सेवा समिती चिंदर, ग्रामस्थ यांच्यावतीने उपस्थितीचे आवाहन.


आचरा | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील आचरा येथील चिंदर गावच्या भगवती माऊलीचा यात्रोत्सव दिंडे जत्रा ४ ते ८ डिसेंबर या कालावधीत संपन्न होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बारापाच मानकरी व श्री देवी भगवती माऊली सेवा समिती चिंदर तर्फे करण्यात आले आहे.


गुरुवार, ४ डिसेंबर रोजी सकाळी भगवती माऊलीची विधिवत महापूजा, बारापाचं मानकरी यांच्यावतीने भगवती माऊलीला साकडे, सकाळी ९ वाजता यात्रेकरू भाविकांचे स्वागत व भगवती माऊलीच्या दर्शनाला सुरुवात, सकाळी ११ पासून भगवती माऊलीस मानकऱ्यांचा महाप्रसाद अर्पण, दिवसभर देवी ओटी, नवस, साकडे आदी, रात्रौ ११ नंतर ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत रामेश्वर मंदिराकडून ग्रामदेवतांच्या तरंगांचे भगवती मंदिरांत आगमन होणार आहे. पहाटे ३ वाजता पुराण गोंधळ व दिंडे जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवीच्या दिवट्यांचे नृत्य होणार आहे.


शुक्रवार ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता श्री देव रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ देऊळवाडी, ६:३० वा. श्री देव ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ साटमवाडी, रात्री ७:३० वा. गावडे पुरुष प्रासादिक भजन मंडळ गावडेवाडी यांचे भजन होणार आहे. रात्रौ ९ नंतर पुराण, किर्तन श्रींची आरती आदी कार्यक्रम होणार आहेत.


शनिवार ६ डिसेंबर रोजी सायंकाळी स्थानिक भजने यात ४ वा. श्री सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ सडेवाडी, ५:३० वा. श्री देव गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ पालकर वाडी, ६:३० वा. श्री देव वाडत्री ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ कोंड अपराजवाडी यांचे भजन, ७:३० वा. श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ कुंभारवाडी यांचे भजन होणार आहे.


रविवार ७ डिसेंबर रोजी ५:३० वा. श्री देव ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ लब्दे वाडी, ६:३० वा. श्री देव ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ तेरई वाडी, ७:३० वा. श्री देव आकारी ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ गावठण वाडी यांचे भजन होणार आहे. रात्रौ ९ वाजता पुराण गोंधळ किर्तन, आरती आदी कार्यक्रम. रात्रौ. १०:३० वा. श्री भवानी रामेश्वर डंपर सर्विस मनोज हडकर पुरस्कृत, श्री दत्त माऊली पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ यांचा महान दशावतार नाट्य प्रयोग 'वेसरोत्पत्ती' सादर होणार आहे.


सोमवार ८ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते ६ वा. चालू वहिवाट दार घाडी कुटुंबिय, सर्व महिला यांच्या मार्फत हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ६ वा. श्री देव पिसाळी ब्राम्हण देव प्रासादिक भजन मंडळ तेरई, ७ वा. श्री देव भगवती प्रासादिक भजन मंडळ भटवाडी यांची भजने होणार आहेत. रात्रौ ९ वा. पुराण, रात्रौ १० वा. भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी आयोजित कौटुंबिक, सामाजिक, हृदयस्पर्शी तीन अंकी नाटक 'सासुरवास' सादर होणार आहे. यानंतर रात्रौ २:३० नंतर गोंधळ किर्तन, लळित समाप्ती व दिवट्या नृत्य आदी कार्यक्रम होणार आहेत. 


बारापाच मानकरी व श्री देवी भगवती माऊली सेवा समिती चिंदर, ग्रामस्थ यांच्यावतीने उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स