'ड्राय डे' जाहीर....!
'ड्राय डे' जाहीर....!
ब्यूरो न्यूज : १ डिसेंबर २०२५ पासून राज्यातील मतदानाच्या ठिकाणी 'ड्राय डे' जाहिर करण्यात आले आहेत. निवडणूक असलेल्या जिल्ह्यातील संबंधित नगरपरिषदा / नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी / विदेशी किरकोळ मद्य विक्री व माडी विक्री अनुज्ञप्ती), बार अँड रेस्टॉरंट, वाईन शॉप, बिअर शॉपी १ डिसेंबर २०२५ रोजी (मतदानाच्या आदला दिवस), २ डिसेंबर २०२५ रोजी (मतदानाचा दिवस) आणि ३ डिसेंबर २०२५ रोजी (मतमोजणीचा दिवस) या तीन दिवशी संबंधित नगरपरिषदा / नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी/विदेशी किरकोळ मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस मद्य विक्रीस बंद ठेवण्याचा आदेश आहे.
काही जिल्ह्यात मतमोजणीच्या दिवशी (३ डिसेंबर) सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मद्यविक्री बंद राहील. त्यानंतर मात्र 'काही जिल्ह्यांमध्ये' मद्यविक्री सुरू होणार असल्याची माहिती आहे.
१ डिसेंबर - मतदानापूर्वीचा दिवस (आदल्या दिवशी),२ डिसेंबर - मतदानाचा दिवस, ३ डिसेंबर - मतमोजणीचा दिवस असे हे दिवस असतील अशी माहिती मिळत आहे.
२ डिसेंबरला, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण ( नगरपरिषद) , सावंतवाडी ( नगरपरिषद) , वेंगुर्ला( नगरपरिषद) व कणकवली ( नगरपंचायत) येथे मतदान संपन्न होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर यांच्या कवितांचा जागर.
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर...
मतमोजणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या सज्जतेचा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा सविस्तर आढावा.
मतमोजणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या...