गेल्या दिड दशकातील सर्वतोपरी सहकार्याबद्दल आपणा सर्वांची कृतज्ञता व्यक्त करायची आहे...!
गेल्या दिड दशकातील सर्वतोपरी सहकार्याबद्दल आपणा सर्वांची कृतज्ञता व्यक्त करायची आहे...!
मालवणवासियांना भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा खोत यांचे सर्व भाजपा उमेदवारांसह विजयी करायचे आवाहन.
'पर्यटक फ्रेंडली' शहराचा व्यक्त केला मानस.
मालवण | ब्यूरो न्यूज : भाजपा नगराध्यक्षा उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत यांनी नगराध्यक्ष पद उमेदवार म्हणून विशेष आवाहन केले आहे. सौ. शिल्पा खोत यांना या नगराध्यक्ष पदाद्वारे, गेल्या दिड दशकात सर्वांनी ज्या प्रकारे सहकार्य, प्रेम आणि प्रोत्साहन दिले, त्यातूनच मला आपल्यासाठी काम करण्याची नवी उर्जा मिळाली असून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असल्याचाही सौ. शिल्पा खोत यांच्या आवाहनाचा आशय आहे.
सौ. शिल्पा खोत म्हणतात की, आज मी आपल्यास सर्वांना एक प्रामाणिक विनंती घेऊन पुन्हा एकदा आपल्या दरवाज्यावर आली आहे. आपल्या विश्वासाचा मान राखण्यासाठी मला आपल्या एक - एक मताची गरज आहे असे त्यांनी विनम्रपणे आवाहन केले आहे.
सौ. शिल्पा खोत पुढे म्हणतात की, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत झपाट्याने प्रगती करीत आहे. मा. नारायण राणेसाहेब, मा. रविंद्र चव्हाण साहेब आणि पालकमंत्री नितेश राणेसाहेब या नेत्यांनी पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल ठेऊन विकास कामांचा धडाका सुरु केला आहे. मला पूर्ण खात्री आहे की मालवणच्या विकासासाठी ही नेते मंडळी काहीही कमी पडू देणार नाहीत.
आपल्या शहराचा विकास हा माझ्या दृष्टीने केवळ घोषणा आणि आश्वासनांचा विषय नाही, तर तो भाजपा म्हणून आम्हा सर्वांची जबाबदारी आहे.
आपण दररोज अनुभवत असलेल्या समस्या जसे शुद्ध पाणीपुरवठा, स्वच्छता, सुंदर रस्ते आणि आरोग्य व्यवस्था, महिलांचा मानसन्मान आणि संरक्षण आणि विद्यार्थ्यांच्या समस्या या केवळ निवडणूक काळातल्या चर्चेपुरत्या न राहता त्यावर ठोस उपाय करणे अत्यावश्यक आहे. माझ्या उच्च शिक्षणाचा फायदा मी मालवणच्या विकासासाठी अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी करीन.
मालवण शहर फक्त ऐतिहासिक नगरी बरोबरीने पर्यटनाचे शहर सुद्धा आहे. पर्यटनामुळे रोजगारीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. म्हणूनच मालवण शहर पर्यटक फ्रेन्डली व्हावे याकरीता खास प्रयत्न करण्याचा माझा मानस आहे. यासाठी शहरात उत्तम सार्वजनिक सुविधा जसे प्रसाधन गृहे, पर्यटन माहिती केंद्रे, सुंदर बस आणि रिक्षाथांबे, पथदिवे, उद्याने आणि उत्कृष्ट घनकचरा व्यवस्थापन या सर्व सेवा दर्जेदार आणि सर्वांसाठी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न करेन, वर्षाला एक पर्यटन महोत्सत्व, नाना नानी विरंगुळा पार्क यांसह अनेक विकास प्रकल्प, पर्यटन प्रकल्प भाजपाच्या माध्यमातून करणार. आजवर आपण पाहिले आहे की, आपल्या अपेक्षा अनेकदा अपूर्ण राहतात, प्रकल्प कागदांमध्येच अडकले जातात आणि निर्णय प्रक्रियेत सामान्य नागरीकांचा आवाज दबला जातो. पण मी आपल्याला वचन देते, आपला प्रत्येक प्रश्न, प्रत्येक मागणी आणि प्रत्येक समस्या माझ्या कामाचा केंद्रबिंदू असेल. एक महिला म्हणून समाजातल्या अनेक आव्हानांचा मी जवळून अनुभव घेतला आहे. घर, कुटुंब, काम, सुरक्षितता आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांना कोणत्या गोष्टींची आवश्यकता भासते, कोणते धोरण खरचं उपयुक्त ठरते हे मी समजून घेतले आहे. त्यामुळेच मी महिलांच्या सक्षमीकरणाला, रोजगार निर्मितीला आणि सुरक्षित, सन्मानाने जगता येईल असे काम आणि व्यवस्था तयार करण्याला माझ्या कार्याचा विशेष भाग बनवू इच्छीते.
आपण मला दिलेले बहुमूल्य मत हा केवळ आकड्यांचा प्रश्न नाही, तर तो आपली आशा, प्रगती आणि भविष्यासाठीचा विश्वास आहे. आपल्या भागातील प्रत्येक कुटुंबाने प्रगतीचा अनुभव घ्यावा, यासाठी मी पूर्ण समर्पणाने आणि पारदर्शकपणे काम करण्याचे वचन देते. म्हणूनच, या निवडणूकीत आपण मला आपला विश्वास, समर्थन आणि बहुमूल्य मत देऊन माझ्या या प्रामाणिक प्रवासात साथ द्यावी हि नम्र विनंती. आपल्या बहुमूल्य मतामुळे मला आपली व आपल्या शहराची सेवा करण्याची संधी मिळेल.
या, आपण सर्व मिळून मालवण शहराला आदर्श, सुरक्षित, समृद्ध आणि लोकप्रिय पर्यटन शहर बनवू !
भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करावे, असे आवाहन भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा खोत यांनी मालवणवासियांना केले आहे.
सौजन्य | मालवण ब्यूरो
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
बांधकाम सभापती तथा नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.
बांधकाम सभापती तथा नगरसेवक सहदेव बापर्डेकर य...
मालवण भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी महा रक्तदान शिबिर.
आमदार निलेश राणे यांनी 'चौकटीत राहून काॅमेडी' करायचा सांस्कृतिक जागृतीपर इशारा दिलेला होता...!
आमदार निलेश राणे यांनी 'चौकटीत राहून काॅमेडी' ...