मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये वायंगवडे ग्रामपंचायतचा उत्स्फूर्त सहभाग.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये वायंगवडे ग्रामपंचायतचा उत्स्फूर्त सहभाग.
मसुरे | प्रतिनिधी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये वायंगवडे ग्रामपंचायतीने १७ सप्टेंबर २०२५ रोजी ग्राम सभा यशस्वीरित्या पूर्ण करून अभियानामध्ये सहभाग नोंदविला. गावातील सार्वजनिक रस्ते, सार्वजनिक विहिरी, स्मशान भूमी, मंदिरे, शाळा, अंगणवाडी इत्यादी परिसराची स्वच्छता लोकसहभाग व श्रमदानाच्या आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय ग्रामसभेमध्ये सर्वानुमते घेण्यात आला. ग्रामसभेला १६५ ग्रामसभा सदस्य उपस्थित होते.
ग्रामसभेच्या निर्णयानुसार गावातील ग्रामस्थांनी नुकतीच कसाल हेदुळ खोटले वायंगवडे कट्टा रस्त्याच्या वायंगवडे गावच्या हद्दीमध्ये दुतर्फा वाढलेली झाडे व गवत एकत्रित येऊन स्वच्छता केली. वायंगवडे गावातील सर्व ग्रामस्थांच्या एकजुटी बाबत व केलेल्या कामकाजा बाबत कौतुक होत आहे. सुमारे ३ किलोमीटर अंतर दोन्ही बाजूला ग्रास कटरच्या साह्याने व दोन्ही बाजूची झाडे तोडून वाहनांना होणारा अडथळा दूर केला. त्यावेळी वायंगवडे गावातील बहुसंख्य ग्रामस्थ श्रमदानासाठी उपस्थित होते. त्यावेळी काही ग्रामस्थांनी नाष्टा चहा पान व काही ग्रामस्थांनी ग्रास कटर साठी लागणारे पेट्रोल ची व्यवस्था सुद्धा केली. त्यावेळी सर्व उपस्थित ग्रामस्थांचे व देणगीदारांचे ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानण्यात आले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, किर्लोस येथे कृषी दिन व कृषी सप्ताह उत्साहात.
त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, किर्लोस येथे क...
श्री रेकोबा हायस्कूलमध्ये शिक्षणमहर्षी एच. डी. गावकर यांना १०७ व्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून अभिवादन.
श्री रेकोबा हायस्कूलमध्ये शिक्षणमहर्षी एच. ड...