ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, किर्लोस येथे कृषी दिन व कृषी सप्ताह उत्साहात.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, किर्लोस येथे कृषी दिन व कृषी सप्ताह उत्साहात.

त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, किर्लोस येथे कृषी दिन व कृषी सप्ताह उत्साहात.

Article image

मसुरे | प्रतिनिधी : महाराष्ट्र कृषी दिन व कृषी सप्ताहानिमित्त त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, किर्लोस येथे, २ जुलै २०२६ रोजी कृषी जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, किर्लोस (ओरस) येथील कृषिकन्यांच्या वतीने करण्यात आले. 


कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक वामन रामचंद्र तर्फे यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर कृषिकन्यांनी महाराष्ट्र कृषी दिनाचे महत्त्व, शेतीचे समाजातील स्थान, आधुनिक व शाश्वत शेती, तसेच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांसमवेत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमासाठी छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, किर्लोस (ओरस) चे प्राचार्य डॉ. भेंडे सर, उपप्राचार्य लेफ्टनंट विवेक राणे तसेच शैक्षणिक प्रभारी विवेक खरात यांचे मार्गदर्शन लाभले.


या कार्यक्रमात कृषिकन्या प्रिया पाटील, स्नेहल जगताप, पार्णिका जाधव, शिवानी के. एस. आणि अमृतांजली पी. आर. यांनी सक्रिय सहभाग घेतला.


कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांनी कृषिकन्यांनी यशस्वी केलेल्या कार्यक्रमाची प्रशंसा करून आभार व्यक्त केले तसेच कृषीविषयक जनजागृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्याची प्रतिक्रिया दिली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स