ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
पोईप हायस्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

पोईप हायस्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात.

पोईप हायस्कूलचे येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात.

Article image

प्रमुख पाहुणे डाॅ. प्रसाद देवधर यांचे विशेष मार्गदर्शन.

 

पोईप | प्रतिनिधी : पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी संचालित सौ. इं. द. वर्दम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. 

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. प्रसाद देवधर, उद्योजक सुरेश नेरुरकर, पोईप ग्रामपंचायत सरपंच श्रीधर नाईक, पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष अनिल कांदळकर, उपाध्यक्ष गोपीनाथ पालव, राठिवडे सरपंच दिव्या धुरी, संस्था संचालक विलास माधव, श्रीकृष्ण माधव, महेश पालव, सत्यवान पालव, नितीन नाईक, मुख्याध्यापक विकास कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. 


यावेळी प्रमुख डाॅ. प्रसाद देवधर यांनी शेती, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन याविषयी माहिती दिली आणि मानसीक आरोग्यविषयक विशेष मार्गदर्शन केले. यावेळी मुलांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम सादर झाले.


संपूर्ण कार्यक्रमाला मुख्याध्यापक विकास कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक शिक्षक दत्तात्रय कारंडे, विष्णू महाजनी, संतोष तावडे, केतकी सावंत, ऋतुजा राऊळ, प्रसाद चव्हाण, शिक्षकेतर कर्मचारी विठोबा माधव, नंदकिशोर तावडे, अभिजीत धुरी यांनी योगदान व सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रसाद चव्हाण व केतकी सावंत यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स