वरेरी देवगडच्या कु.जान्हवी नागेश बाक्रे हिचे कराटेत जयपुरी यश...!
आचरा | अनिकेत पांगे : देवगड वरेरी येथील कु.जान्हवी नागेश बाक्रे हिने राजस्थानातील जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे विजेतेपद स्पर्धेत विशेष गुणवत्तेसह सुवर्णपदक मिळवून अवघ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला व महाराष्ट्र राज्याला सन्मान मिळवून दिला आहे.
आता थायलंडमधील बॅन्काॅक येथे होणार्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी ती पात्र ठरली असल्याने भारतासाठीही पदकनिश्चितीच्या आशा आता निर्माण झाल्या आहेत.
कु.जान्हवी नागेश बाक्रे हिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
आचरा येथील यशराज प्रेरणा गृपचे श्री. मंदार सरजोशी यांनी तिची विशेष प्रशंसा केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)