ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
काळसे धामापूर मधील महिनाभर कोलमडलेली दूरध्वनी सेवा २४ तासात सुरळीत..!

काळसे धामापूर मधील महिनाभर कोलमडलेली दूरध्वनी सेवा २४ तासात सुरळीत..!

प्रकाशन: 31 Oct 2021 09:32 AM
वाचन संख्या 63

निवृत्त उपजिल्हाधिकारी विनोद गोसावी यांच्या पाठपुराव्याला यश.
बी.एस.एन.एल. अधिकारी प्रविण कवडे यांचे बहुमोल सहकार्य.

चौके | अमोल गोसावी : काळसे टेलिफोन एक्सचेंज अंतर्गत असणारी काळसे धामापूर गावातील बीएसएनल ची लॅंडलाईन सेवा सुमारे महिनाभर नादुरुस्त होऊन विस्कळीत झाली होती. जवळपास १२० दूरध्वनी ग्राहक या समस्येमुळे त्रस्त होते.
या असुविधेला काळसे गोसावीवाडीचे सुपुत्र तथा सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विनोद गोसावी यांनी वाचा फोडून ॲक्शन घेण्याच ठरवलं आणि त्याप्रमाणे दोन दिवसात दूरध्वनीमधील समस्या दुर करण्याचं आवाहन करणारं एक निवेदन तयार करून त्यावर दुरध्वनी ग्राहकांच्या सह्या घेऊन सदरचे निवेदन पत्रकार अमोल गोसावी यांच्यामार्फत मालवण तालुक्याचे बी.एस.एन.एल अधिकारी यांच्यापर्यंत २७ ऑक्टोबर रोजी पोहोचवले.
काळसे धामापूर ग्रामस्थांच्या या निवेदनाची तातडीने दखल घेतली ती मालवण येथे नव्यानेच हजर झालेले बी.एस.एन.एल मालवणचे उपविभागीय अभियंता प्रविण कवडे यांनी. प्रविण कवडे यांनी तातडीने २८ ऑक्टोबर रोजी काळसे एक्सचेंज मध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत दाखल होत लॅंडलाईन दूरध्वनीमध्ये असणाऱ्या त्रूटी दुर करण्याचे काम हाती घेतले. कवडे यांनी कोल्हापूर उपविभागीय अभियंता प्रशांत पाटील, मालवणचे सहाय्यक अभियंता प्रकाश सरगर आणि काळसे एक्सचेंज चे कर्मचारी राजा सावंत या सहकाऱ्यांसह दिवसरात्र सलग १५ तास काम करून काळसे धामापूर मधील दूरध्वनी ग्राहकांना दिलासा देत लॅंडलाईन फोनला डायल टोन न येणाऱ्या समस्येचे निराकरण केले. आणि अजूनही जर काही त्रूटी राहिल्या असतील तर त्या लवकरच दुर केल्या जातील असेही आश्वासन कवडे यांनी काळसे धामापूर मधील दूरध्वनी ग्राहकांना दिले आहे.
बी.एस.एन.एल अधिकारी प्रविण कवडे यांनी तत्परतेने काम करून ग्राहकांना दिलासा दिल्याबद्दल काळसे धामापूर ग्रामस्थांनी कवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स