मसदे तलाठी कार्यालयाच्या नूतन वास्तुचे माजी सभापती अनिल कांदळकर यांच्या हस्ते उद्घाटन.
मसदे तलाठी कार्यालयाच्या नूतन वास्तुचे माजी सभापती अनिल कांदळकर यांच्या हस्ते उद्घाटन.
पोईप | प्रतिनिधी : ,विरण बाजार येथील शासकीय जागेत, मसदे तलाठी कार्यालयाचे उद्घाटन, देव दिवाळीचे औचित्य साधून माजी सभापती अनिल कांदळकर यांच्या हस्ते आणि मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, पोलिस पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जनतेची गैरसोय लक्षात घेता ही नूतन वास्तू उभारण्यात आली असून यासाठी माजी सभापती अनिल कांदळकर यांनी विशेष पाठपुरावा केला होता. ठेकेदार नितेश पवार यांनी या वास्तुच्या बांधणीची पूर्तता शासन अपेक्षित निविदेनुसार केल्याचे समजते.
दरम्यान या कार्यालत कामकाजासाठी उद्योजक सुरेश नेरुरकर यांनी लॅपटॉप व प्रिंटर भेट (वस्तुरुप देणगी) स्वरुपात दिला आहे व विद्युत मिटरसाठी अनिल कांदळकर यांनी आर्थिक मदत आहे.
या उद्घाटनप्रसंगी अनिल कांदळकर यांच्या सह सुरेश नेरुरकर, मसदे चुनवरेच्या प्रभारी सरपंच सौ . शमिका वाडकर, बाबु परब, विलास पांजरी, आपू आंबेरकर, अमित कुशे, बाबु वाडकर , रमेश वाडकर, मसदे पो. पाटील निनाद मांडते , चुनवरे पो. पाटील महेश परब, वडाचा पाट पो. पाटील विजय पालव, दिलीप कांदळकर, मंडल अधिकारी .संतोष गुरखे , तलाठी मसदे तावडे , पोईप तलाठी काटे , बेलाची वाडी तलाठी जाधव, कर्मचारी अनिकेत कासले, संतोष नाईक, गणेश पवार व इतर उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)