कोकणातील नद्या, खाड्या, समुद्र किनारी जल पर्यटन सुरू करावे...!
कोकणातील नद्या, खाड्या, समुद्र किनारी जल पर्यटन सुरू करावे...!
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांची मागणी.
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी जल पर्यटनविषयक मागणी करताना सांगितले की, तिलारी धरणावर ज्याप्रमाणे जल पर्यटन सुरू होत आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने जल पर्यटन कोकणातील सर्वच नद्या, खाड्या, समुद्रकिनारी सुरु होणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या एक खिडकी योजने द्वारे सुलभतेने सर्वानाच मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कोकणात रोजगार निर्मिती होईल देशातून, परदेशातूनही पर्यटक कोकणात येतील त्यामुळे कोकणाचा विकास होईल, पर्यायाने राष्ट्राची सुद्धा आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली होईल यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व सर्वच पालकमंत्री यांनी इच्छा शक्ती दाखवून त्वरित तशी घोषणा करावी आणि योजना अंमलात आणावी असे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले. यासंदर्भात त्यांनी सन्माननीय खासदार नारायणराव राणे व सन्माननीय आमदार कालिदास कोळंबकर यांची भेट घेऊन निवेदन दिले होते अशी माहिती श्रीकांत सावंत यांनी माध्यमांना प्रसिद्धी संदेश पत्राद्वारे दिली आहे.
या निवेदनात कोकणच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पर्यटन विकास होणे गरजेचे आहे त्यासाठी कोकणातील सर्वच बंदरांचा विकास अलिबाग जवळील मांडवा बंदर विकास धर्तीवर व्हावा अनेक वर्षे बंद केली गेलेली बोट पूर्ववत सुरू करावी. सर्व बंदरात पर्यटन दृष्ट्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याकरिता केंद्र सरकारने भरीव निणधी उपलब्ध करून देणे आवश्यकता आहे असेही श्रीकांत सावंत यांनी निवेदनात नमूद केले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन.
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.