ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
'नारी इन सारी' मॅरेथाॅन स्पर्धा उत्साहात...!
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

'नारी इन सारी' मॅरेथाॅन स्पर्धा उत्साहात...!

प्रकाशन: 18 Nov 2025 03:18 PM
वाचन संख्या 201

'नारी इन सारी' मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात...!


वीरमाता झाँशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीचे औचित्य साधून पलावा योगपरिवाराचा उपक्रम.


अशोक दाभोळकर यांची उपस्थिती. 

Article image


मसुरे | प्रतिनिधी : वीरमाता झाँशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीचे औचित्य साधून पलावा योगपरिवाराने नारी इन साडी या तीन किमी व पाच कि.मी. धावणे ह्या स्पर्धेचे आयोजन केले होते. ह्या स्पर्धेसाठी पलावातील १८ ते ७० वयोगटातील १८० माताभगिनींनी, पारंपरिक नऊ वारी साडी, मुंडासे, ढाल - तलवार तसेच भाले स्पर्धेत सहभागी होत स्पर्धेला प्रतिसाद दिला. 

Article image

कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून सेवानिवृत्त कॅप्टन रवी चौहान, के. एन. सिंग (नेव्ही ), अशोक दाभोलकर (रेल्वे), निकेत सिंग, श्रीमती विणा चौहान तसेच श्रीमती अनिता वाजपेयी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विजेते तसेच सहभागी महिलाना पुरस्कार तसेच पदके देऊन सन्मानीत करण्यात आले.


'नारी इन सारी' हा उपक्रम राबवताना श्री. आनंदसरांच्या मार्गदर्शनाखाली पलावा योग परिवारातील सर्वश्री जालिंदर, दिनेश, सागर,अक्षय, अमित, स्वरुप, विनायक, पुष्पराज, मंगेश, अंकुश, अजय, केतन, नंदलाल, प्रदिप, महेन्द्र, अनुराग, डॉ. विजय, मुकेश एम., सुनील, पी.एन.गुप्ता, भार्गवी, भावार्थ, लविशा, श्रेयांश, अद्वीता, जेनिका, आरती, जेविका, सोनिया, भूमी, स्विकृती, हेमा, उदिता, हितेंद्र, शोभीत, सुनिल अंकल, फातिमा आदी कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतोनात मेहनत घेतली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स