ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
सरपंच जेराॅन फर्नांडिस यांचे ग्रंथ दातृत्व आणि ग्रंथ महतीची जाणीव ठरतायत प्रशंसेचा विषय...! ( संपादक
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

सरपंच जेराॅन फर्नांडिस यांचे ग्रंथ दातृत्व आणि ग्रंथ महतीची जाणीव ठरतायत प्रशंसेचा विषय...! ( संपादक

सरपंच जेराॅन फर्नांडिस यांचे ग्रंथ दातृत्व आणि ग्रंथ महतीची जाणीव ठरतायत प्रशंसेचा विषय...! ( संपादकीय.)


संपादकीय : मालवण तालुक्यातील आचरे ग्रामपंचायत सरपंच आचरे गावचे सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी शालेय विद्यार्थ्यांना, श्री. सुरेश ठाकुर लिखीत 'शब्दांच्या पलिकडले' या पुस्तकाच्या ८० पुस्तकांचे वाटप केले आहे. कोमसाप मालवणचे अध्यक्ष, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शिक्षक आणि प्रतिथयश लेखक श्री. सुरेश ठाकुर यांचे 'शब्दांच्या पलिकडले' हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले असून त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. 

न्यू इंग्लिश स्कूल, आचरे हायस्कूल मध्ये एका विशेष कार्यक्रमात हे ग्रंथदान झाले अशी माहिती कोमसाप अध्यक्ष श्री. सुरेश ठाकुर यांनी दिली आहे. स्कूल कमिटी अध्यक्ष जकारियस फर्नांडिस हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.


Article image


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा माणगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनघा कदम आणि मुख्याध्यापक अंकुशराव घुटुकडे (न्यू इंग्लिश स्कूल , पाचोरा) यांनी आभार प्रदर्शन केले. 

Article image

कार्यक्रमात अनिरुद्ध आचरेकर आणि पाटकर यांच्या प्रमुख साथीने 'बोलतो मराठी' हे गीत आणि पसायदान सादर झाले. यावेळी सुगंधा गुरव, दादा बाप परडेकर,राजन पांगे आदी उपस्थित होते.  

Article image


या कार्यक्रमात, सरपंच जरोन फर्नांडिस यांनी ८० विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले.


आठवडाभर आधी, 'शब्दांच्या पलिकडले' कार्यक्रमाच्या प्रकाशन सोहळ्यात मंचावर, सरपंच जेराॅन फर्नांडिस यांची संपूर्ण कार्यक्रमाला सक्रीय आणि साहित्याशी समरसून प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या साहित्य प्रसार जाणीवेची तसेच ग्रंथ महतीच्या सक्रीय जाणिवेची विशेष प्रशंसा होत आहे.  

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स