ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवण दांडी परिसरातील अनेक नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवण दांडी परिसरातील अनेक नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश.

प्रकाशन: 15 Nov 2025 09:55 PM
वाचन संख्या 139

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवण दांडी परिसरातील अनेक नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश.

Article image


आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी प्रवेशर्त्यांचे केले स्वागत.



मालवण | ब्यूरो न्यूज : आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन 'मालवण नगरपरिषद प्रभाग ९' येथील महेश अशोक कोयंडे यांसह परिसरातील अनेक नागरिकांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.

 

मालवण शहराचा गतिमान विकास होत असताना निधी कमी पडू देणार नाही. नगरविकासच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल. २१ व्या शतकातील मालवण शहर बनवणार असल्याचा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.


यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते, शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर, शहर प्रमुख दिपक पाटकर, संघटक राजू बिडये, मोहन वराडकर, जगदीश खराडे, घनःशाम जोशी, अभि गावडे, कमलाकर कोचरेकर, संदीप मालंडकर, सचिन मोर्वेकर, निकीत वराडकर, मंदार लुडबे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


आमदार निलेश राणे हे राणे साहेबांप्रमाणे विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व आहेत. वर्षभरात मोठा विकासनिधी त्यांनी मतदार संघात आणला. विकासासाठी त्यांची असलेली तळमळ जनतेने अनुभवली. मालवण शहरातील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विशेष नियोजन केले. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स साठी निधी आणला. नळपाणी योजना आणली. विकासाची ही गती आगामी काळात अशीच सुरु राहील, असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला, अशी माहिती मिळत आहे. 


यावेळी दांडी येथील महेश अशोक कोयंडे यांसह दांडी परिसरातील अनेक नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात मुकुंद आचरेकर, हेमराज रोगे, मकरंद खवणेकर, चेतन जोशी, विष्णु जोशी, नानू रोगे, आनंद आचरेकर, गिरीधर आचरेकर, दत्ताराम जाधव, सदाशिव रोगे, धोंडी लोणे, बाबू जोशी, रविंद्र केळूसकर, सुरेश सनये, विलास लोणे, महेंद्र कोयंडे, ज्ञानदेव केळूसकर, हरिदास रोगे, अरविंद आचरेकर, यशवंत खवणेकर, संजय रोगे, किरण हुर्नेकर, विजय जोशी, नूतन रोगे, रसिका येरागी, मानसी कोयंडे, समीरा कोयंडे, मृणाल कोयंडे, ईश्वरी जोशी, जलवंती लोणे, नम्रता जोशी, योगिता जोशी, शितल रोगे, सुजाता रोगे, रीना मालंडकर, आर्या कुबल, चंद्रकला जाधव, मनिषा आचरेकर, हर्षदा रोगे, गायत्री रोगे, रुवी आडकर, तिलोत्तमा लोणे, दर्शना सादये, सुषमा जोशी, भारती रोगे, सीताबाई परब, गीता मसुरकर, गुलाब आचरेकर, विद्या जोशी, राधा आचरेकर, निलम लोणे, सुलभा खवणेकर, यमुना आचरेकर, गीता आचरेकर यांसह अन्य नागरिक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक - सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उद्योजक दत्ता सामंत

लोकप्रिय टॅग्स