जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांचा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मालवणात नगरपरिषद व विविध विभागांचा आढावा.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांचा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मालवणात नगरपरिषद व विविध विभागांचा आढावा.
मालवण | ब्यूरो न्यूज : आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मालवण नगरपरिषदेले भेट देत आढावा घेत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत अशी माहिती मिळत आहे. त्यानंतर त्यांनी शहरातील टोपीवाला हायस्कूल येथील केंद्राची पाहणी केली असेही समजते आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक थोरात, नगरविकास विभाग सिंधुदुर्ग जिल्हा सह आयुक्त विनायक औंधकर, वरीष्ठ लिपिक महेश परब आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडून आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या. स्ट्राँग रूम तसेच अन्य बाबींची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी शहरातील टोपीवाला हायस्कूल येथील मतदान केंद्राची भेट देत पाहणी केली. या पाहणीनंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी मालवणच्या तहसील कार्यालयाला भेट देत आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शहरात अति संवेदनशील मतदान केंद्रे नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले आहे अशी माहिती मिळत आहे.
शहरातील तहसील कार्यालयाची इमारत जुनी झाली आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी गळतीची समस्या भेडसावत असते. याशिवाय अनेक समस्या आहेत. शिवाय नूतन इमारतीचा प्रस्ताव सादर झाला आहे. मात्र अद्याप याबाबतची कोणतीही कार्यवाही झालेली नाही असे निदर्शनास आणून दिले असता याबाबतची सविस्तर माहिती घेऊन इमारती बाबत आवश्यक कार्यवाही केली जाईल असे जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी स्पष्ट केले.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यामध्ये राजकोट किल्ला, शासकीय विश्रामगृह याठिकाणीही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली, अशी माहिती मिळत आहे.
सौजन्य | मालवण ब्यूरो
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...