ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
व्हाॅईस ऑफ मीडिया' संघटनेची दोडामार्ग पोलीस स्टेशनला 'पत्रकार बदनामी' बाबत तक्रार.

व्हाॅईस ऑफ मीडिया' संघटनेची दोडामार्ग पोलीस स्टेशनला 'पत्रकार बदनामी' बाबत तक्रार.

प्रकाशन: 12 Nov 2025 01:02 PM
वाचन संख्या 210

व्हाॅईस ऑफ मीडिया' संघटनेची दोडामार्ग पोलीस स्टेशनला 'पत्रकार बदनामी' बाबत तक्रार. 


दोडामार्ग | ब्यूरो न्यूज : 'व्हाॅईस ऑफ मिडिया' ह्या पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी कार्यरत असलेल्या संघटनांच , दोडामार्ग पोलिस स्थानकात 'पत्रकार बदनामी' संबंधित तक्रार देण्यात आली आहे तसेच हे निवेदन 'व्हाॅईस ऑफ मीडिया' व इतर डिजिटल मिडियाच्या पत्रकार बांधवांनी दिल्याची माहिती मिळत आहे.



१० नोव्हेंबर रोजी एका 'मित्र मंडळाच्या" व्हॉट्सअप समूहात एकाने पत्रकारांविरोधात अपमानास्पद, खोटी आणि बदनामीकारक पोस्ट प्रसारित केली होती असे समजते आहे. या पोस्टमुळे समाजामध्ये पत्रकारांविषयी गैरसमज निर्माण होऊन त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का बसला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून ही कृती भारतीय दंड संहितेची काही कलमे आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० अंतर्गत गुन्हा ठरतो असे तक्रारीत नमूद केल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे संबंधित इसमावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली असल्याचे समजते.

Article image


यावेळी व्हाॅईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष भूषण सावंत, कार्यकारिणी सदस्य प्रथमेश गवस, तालुकाध्यक्ष बुधाजी (आपा) राणे, सचिव प्रतिक राणे, पत्रकार प्रमोद गवस, गोविंद शिरसाट उपस्थित होते.


यावेळी उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांनी तक्रार स्विकारून, संबंधितावर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले असल्याची माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 111

लोकप्रिय टॅग्स