ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
चला फाॅर्म भरायला...!
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

चला फाॅर्म भरायला...!

चला फाॅर्म भरायला...!

Article image


आजपासून निवडणुकांचा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू...!


मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरणात खऱ्या अर्थाने लगबग वाढली आहे. आजपासून उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार असल्याने सकाळपासूनच विविध पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या दावेदारांसह निवडणूक कार्यालयांमध्ये दिसू लागले. मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या युती आणि स्वबळाच्या चर्चांना आता प्रत्यक्ष उमेदवारीच्या रणांगणात उतरायची वेळ आली आहे.


मागील काही वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष लागलेले आहे. स्थानिक नेतृत्वाला आपली ताकद सिद्ध करण्याची ही मोठी संधी मानली जात आहे. यावेळी विकासकामे, स्थानिक प्रश्न, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा आणि प्रशासनातील विलंब या प्रमुख मुद्द्यांवर चुरशीची लढत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील नागरी प्रशासनाचा दिशादर्शक ठरणाऱ्या या निवडणुका कोणाच्या बाजूने कलाटणी घेतील, याकडे संपूर्ण सिंधुदुर्गचं लक्ष लागलं आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स