ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
श्री देव रामेश्वर कांदळगांव यांचा २ डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

श्री देव रामेश्वर कांदळगांव यांचा २ डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव.

प्रकाशन: 10 Nov 2025 10:12 AM
वाचन संख्या 117

श्री देव रामेश्वर कांदळगांव यांचा २ डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव.


श्री देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये विश्वस्त मंडळ कांदळगांव, राणे परब मानकरी आणि कांदळगांव ग्रामस्थ यांचे उपस्थितीचे आवाहन. 


मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या श्री देव रामेश्वर, कांदळगांव यांचा, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला तसेच कोकणातील सन्मानाचा असा वार्षिक जत्रोत्सव २ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न होत आहे. श्री देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये विश्वस्त मंडळ कांदळगांव, राणे परब मानकरी आणि कांदळगांव ग्रामस्थ यांच्यावतीने ही माहिती देण्यात आली आहे.  

Article image


२ डिसेंबर रोजी सकाळी शिवपिंडीचे स्नान - अभिषेक आणि त्यानंतर विविध धार्मिक विधी व कार्यक्रम संपन्न होणार आहेत.


रात्री १० नंतर पालखी लवाजम्यासह, पारंपरिक वाद्यांच्या गजरात व भक्तीपूर्ण उत्साहात श्री देव रामेश्वर यांचे वारेसूत्र तसेच श्री देव रामेश्वर मंदिर परिसरातील सर्व देवस्थानांची भेट असे कार्यक्रम संपन्न होणार आहेत. त्यानंतर श्री देव रामेश्वर गादीवरती स्थानापन्नता व भक्तांना आशिर्वादाचा कार्यक्रम संपन्न होईल.


त्यानंतर रात्री सुप्रसिद्ध गोरे दशावतार नाट्य मंडळ यांचे दशावतार नाट्य सादरीकरण होणार आहे. पहाटे दशावतार नाट्यानंतर मंदिराच्या तळीमध्ये, दशावतारातील श्रीकृष्ण पात्राच्या हस्ते दह्याचे गाडगे फोडून उत्सवाची सांगता होईल अशी माहिती मिळत आहे.


यंदा, प्रतिवर्षाप्रमाणे श्री देव रामेश्वर कांदळगांव जत्रोत्सवाला असंख्य भाविक भक्तांची उपस्थिती असून त्या अनुषंगाने सर्व तयारी करण्यात येत असल्याची माहिती श्री देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये विश्वस्त मंडळ कांदळगांव, राणे परब मानकरी आणि कांदळगांव ग्रामस्थ यांच्यावतीने देण्यात आली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...

11 Aug 2026 281

लोकप्रिय टॅग्स