ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
आचरा येथे तालुकास्तरीय कविता स्पर्धा उत्साहात.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

आचरा येथे तालुकास्तरीय कविता स्पर्धा उत्साहात.

आचरा येथे तालुकास्तरीय कविता स्पर्धा उत्साहात.

Article image



आचरा : मालवण तालुक्यातील नवकवींसाठी यशराज प्रेरणा आचरा व वायंगणी विकास मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आचरा डॅफडिल्स रिसार्ट येथे आयोजित तालुकास्तरीय कविता स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन आचरा उपसरपंच संतोष मिराशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढून तसेच श्री देव रामेश्वर, श्री देवी सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. 


ज्येष्ठ कवी रुजारिओ पिंटो व रामचंद्र कुबल यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. अक्षय सातार्डेकर यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन केले.



या स्पर्धेत अनुराधा अनिरुद्ध आचरेकर यांनी प्रथम क्रमांक, मधुरा वझे यांनी द्वितीय क्रमांक तर मैत्रीय बांदेकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. 


अश्विनी सावंत प्रथम उत्तेजनार्थ, भूषण दत्तदास यांना व्दितीय उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. सौरभ चव्हाण, सदगुरू साटेलकर, मेहेक शेख, नरेंद्र कोदे, स्वालिया शेख, योगेश मुणगेकर, अर्चना गव्हाणकर यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 


या दरम्यान कार्यक्रमात ज्येष्ठ कवी रुजारिओ पिंटो, मंदार सांबारी व रामचंद्र कुबल यांचे विशेष काव्य सादरीकरण संपन्न झाले. यावेळी निलेश सरजोशी, मंदार सरजोशी, अनुष्का गांवकर, जयप्रकाश परूळेकर, रविंद्र गुरव, बाबाजी मिसळे, भावना मुणगेकर, अशोक कांबळी, सचिन रेडकर, श्रीकृष्ण वायंगणकर, अनिरूद्ध आचरेकर, विनय वझे, स्वप्निल गोसावी, मानसी सरजोशी, राजेश भिरवंडेकर, खूशी बापट, गौरी बापट आदी मान्यवर, रसिक उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश भिरवंडेकर यांनी केले तर ॲड. समृध्दी आसोलकर यांनी आभार प्रदर्शन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स