ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
आंबडोस माजी सरपंच व जेष्ठ कार्यकर्ते दिलीप परब यांच्यासह ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

आंबडोस माजी सरपंच व जेष्ठ कार्यकर्ते दिलीप परब यांच्यासह ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश.

प्रकाशन: 09 Nov 2025 09:32 PM
वाचन संख्या 331

आंबडोस माजी सरपंच व जेष्ठ कार्यकर्ते दिलीप परब यांच्यासह ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश.

Article image

Article image


आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे केले स्वागत.


मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील आंबडोस गावाचे माजी सरपंच तथा जेष्ठ कार्यकर्ते दिलीप सीताराम परब यांनी अनेक सहकारी व ग्रामस्थांसह शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्ते यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी माजी सरपंच दिलीप परब तसेच अजिंक्य परब, निवृत्ती परब व सहकारी यांच्या वतीनेही आमदार निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.

Article image

Article image


यावेळी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले की, गावागावात जनतेला अपेक्षित असलेला विकास साध्य करत असताना मतदार संघात अधिकाधिक विकासनिधी खेचून आणणे हेच आपले पाहिले लक्ष आहे. विधानसभा, मंत्रालय स्तरावरून विकासनिधी प्राप्त होत असताना राणे हे आडनाव असल्यामुळे अधिक सोपे होते. यापुढे मालवण कुडाळ मतदारसंघ सर्वाधिक विकास निधीच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासह राज्यात आदर्श मतदारसंघ बनवणार असा विश्वास देखिल आमदार निलेश राणे यांनी मालवण आंबडोस येथे बोलताना व्यक्त केला.


आंबडोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह माजी सरपंच दिलीप परब, सरपंच सुबोधिनी परब, माजी सरपंच विष्णू परब, तालुकाप्रमुख राजा गावडे,

उपतालुकाप्रमुख भाऊ चव्हाण, शहर प्रमुख दिपक पाटकर, जेष्ठ पदाधिकारी बाळू कुबल, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, सचिव राहुल बागवे, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, अभि लाड, माजी सरपंच वरवडेकर, नांदरुख सरपंच भाऊ चव्हाण, श्याम वाक्कर, धोंडी नाईक, युवासेना विभागप्रमुख विशाल धुरी, पशा नाईक यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 


यावेळी सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल जनार्दन नाईक, सुरेश परब, चंद्रकांत परब, सुलोचना राणे, सुधा परब, प्रणाली चव्हाण, पूजा परब, यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 


जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे संबोधन.

Article image


यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी संबोधित करताना सांगितले की, १९९० साल पासून, आमडोस हा गाव नेहमीच राणे साहेबांसोबत राहिला. १०० टक्के मताधिक्य देणारा हा गांव आहे. या गावच्या विकासासाठी आमदार निलेश राणे यांनी विशेष लक्ष दिले आहे. तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत २५ लाख निधी मंजूर होईल. सोबतच गावच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निलेश राणे कटीबद्ध असल्याचे दत्ता सामंत म्हणाले.


यावेळी बाळू कुबल यांनीही आमदार निलेश राणे यांच्या कार्याचा विशेष गौरव केला. 


यावेळी माजी सरपंच दिलीप परब म्हणाले की, आमदार निलेश राणे यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्यशैलीतून विधानसभेत ठसा उमटवला असून मतदारसंघातील जनतेला विकासकर्यातून न्याय मिळवून देत आहेत. त्यांच्या कार्य शैलीवर प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया माजी सरपंच दिलीप परब यांनी दिली आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचा विशेष उल्लेख दिलीप परब यांनी केला. आम्ही राणे साहेबांचीच माणसे. काही गैरसमजातून राणे कुटुंबापासून दूर होतो. आता पुन्हा एकत्र आलो यांचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.  


आंबडोस माजी सरपंच दिलीप परब आंबडोस गावातील ज्या अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे असे समजते आहे त्यांची नावं खालील प्रमाणे आहेत अशी माहिती मिळत आहे. 


विजय नाईक, दीपलक्ष्मी परब, नारायण परब, आनंद साळगावकर, बाबी परब, दिपक नके, दीपिका नके, संजय साळगावकर, अजिंक्य परब, निवृत्ती परब, मारुती परब, रामकृष्ण परब, शैलेश कदम, प्रकाश चव्हाण, सत्यवान साळगावकर, प्रकाश दळवी, दीपक परब, विष्णू साळगावकर, समृद्धी दळवी, सुंदरी चव्हाण, सायली साळगावकर, सुहासिनी दळवी, निकिता परब, रिया इंदुलकर, योजना परब, आरती परब, हरिश्चंद्र परब, हर्षदा परब, अनिकेत करावडे, शांताराम साळगावकर, विश्वनाथ करावडे, दर्शना करावडे, गुरुनाथ परब, दत्ताराम परब, कृष्णाजी करावडे, एकनाथ नाईक, भरत बुठ्ठे, जनार्दन नाईक, विवेक सावंत, अमित राणे, विनायक सावंत, दयानंद पाटकर, मंगेश नाईक, पूजा कदम, प्रणाली चव्हाण, पूर्णानंद कदम, सखाराम नाईक, जयश्री नाईक, राजश्री नाईक, नवनाथ परब, सुलोचना साबाजी परब, साबाजी परब, पुंडलिक परब, दिपक परब, प्रकाश परब, संगीता करावडे, रुपाली परब, ममता नाईक, संदेश परब, विनोद परब, ओंकार परब, राजश्री परब यांसह मोठया संख्येने अन्य ग्रामस्थ यांनी शिवसेनेत प्रवेश केला.


सौजन्य | मालवण ब्यूरो

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स