पोस्ट ऑफिसमधल्या ऑनलाईन सुविधांच्या सुधारणेकडे रामगड सरपंचांनी जिल्हा डाक निरीक्षकांचे लक्ष वेधले.
पोस्ट ऑफिसमधल्या ऑनलाईन सुविधांच्या सुधारणेकडे रामगड सरपंचांनी जिल्हा डाक निरीक्षकांचे लक्ष वेधले .
मसुरे | प्रतिनिधी : रामगड पोस्ट ऑफिस मधे ऑनलाइन सेवा पूर्णपणे कोलमडली असल्याबाबत जिल्हा डाक निरीक्षक निशांत शुक्ला यांचे रामगड सरपंच शुभम मटकर व ग्रा. पं. सदस्य अमित फोंडके यांनी लक्ष वेधले अशी माहिती मिळत आहे.
रामगड गावामधील पोस्ट ऑफिस मधे पूर्वी बीएसएनएल ची इंटरनेट सेवा होती त्याच्या अनिमियतेबाबत तक्रारी करून त्याबाबत ग्रामपंचायत रामगड मार्फत पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर पीओसीबी यंत्रणेसाठी खाजगी पुरवठादार नेमून इंटरनेट सुविधा पूर्ववत झाली मात्र या नविन यंत्रणेची सुविधा पूर्णपणे सुरू झाली नसून ग्रामस्थांना कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. रामगड पोस्ट ऑफिस मधे पंचक्रोशी मधील ग्रामस्थ येत असून ही सुविधा लवकर पूर्ववत करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन पोस्ट विभागाकडून देण्यात आले असे समजते आहे
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...