रस्त्यात सापडलेला मोबाईल मूळ मालकाकडे केला सुपूर्द.
रस्त्यात सापडलेला मोबाईल मूळ मालकाकडे केला सुपूर्द.
मसुरेचे पत्रकार प्रतिनिधी झुंजार पेडणेकर यांच्या 'शोधक नजरेचा' असाही प्रत्यय ; आशिष आईर यांचे महत्वपूर्ण सहकार्य.
देवगड | ब्यूरो न्यूज : मुणगे ते देवगड रस्त्यावर सापडलेला मोबाईल पुन्हा मूळ मालकाचा शोध घेऊन परत केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. मोबाईल मूळ मालकाकडे परत करण्यामध्ये मुणगे तिठा येथील श्री भगवती झेरॉक्स आणि स्टेशनर्सचे मालक आशिष आईर यांनी मेहनत घेतली.
मिठबाव येथील अनघा फाटक यांचा सुमारे पंधरा हजार रुपये किमतीचा अँड्रॉइड मोबाईल हिंदळे व मुणगे गावच्या सीमेवर तीन धोंडा येथे प्रवासा दरम्यान रस्त्यात पडला होता. हा मोबाईल हिंदळे येथे कामासाठी गेलेल्या पत्रकार झुंजार पेडणेकर यांना रस्त्यात दिसला. मसुरे येथे त्यांना यायचे असल्याने मोबाईल मालकाला पुन्हा मसुरे येथे मोबाईल न्यायला यायला लागू नये यासाठी त्यांनी मोबाईल मुणगे येथील आशिष आईर यांच्या जवळ सुपूर्द करत मालकाचा शोध घेण्यास सांगितले.
दरम्याच्या कालावधीत अनघा फाटक या वायंगणी येथील पेट्रोल पंपावर आल्या असता त्यांना मोबाईल गहाळ झाल्याचे लक्षात आले. दुसऱ्या मोबाईल नंबर वरुन त्यांनी स्वतःच्या मोबाईलला कॉल केला असता आशिष आईर यांनी मोबाईल मुणगे येथे असल्याचे सांगितले. फाटक यांनी आशिष आईर यांच्या दुकानात येऊन मोबाईल स्वीकारताना आभार मानले. मोबाईल परत करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आशिष आईर यांचे कौतुक होत आहे.
या घटनेच्या माहितीनंतर मसुरेचे पत्रकार प्रतिनिधी झुंजार पेडणेकर यांच्या 'शोधक नजरेचा' असाही प्रत्यय आल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत असून सहकार्य केलेल्यांची प्रशंसा होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम कडून 'छापील वृत्तपत्र खरेदीवरील निर्बंधाचा निर्णय' तातडीने मागे घ्यायची शासनाकडे मागणी.