ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
'शिवराज भूषण' महानाट्य लवकरच व्यावसायिक रंगभूमीवर..!
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

'शिवराज भूषण' महानाट्य लवकरच व्यावसायिक रंगभूमीवर..!

'शिवराज भूषण' महानाट्य लवकरच व्यावसायिक रंगभूमीवर..! 


मालवण | ब्यूरो न्यूज : छत्रपती शिवाजी महाराज आणि कवी भूषण यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या 'शिवराज भूषण' या महानाट्याने डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सिंधुदुर्गात पाच प्रयोग सादर करून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत असल्याचे समजते आहे. सिंधुदुर्ग पाठोपाठ जानेवारी महिन्यात या महानाट्याचे तीन प्रयोग होतील असे श्री शिवराज मंच मालवणचे प्रमुख व शिवराज भूषण महानाट्याचे निर्माते भूषण साटम यांनी स्पष्ट केले आहे अशी माहिती मिळत आहे.

Article image


या महानाट्यात, छत्रपती शिवरायांच्या जीवनातील आणखीन शौर्यपूर्ण प्रसंगांचा समावेश व त्याला अनुसरून अश्वाचा वावर वाढवण्यासाठी ,'कृष्णा' ह्या अश्वाचा समावेश होत असून त्याच्या नामकरण प्रसंगी चौके येथे भूषण साटम यांच्यासह शिवराज भूषण महानाट्याचे दिग्दर्शक गणेश मेस्त्री, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई, संतोष गावडे, अमित खोत, कृष्णा ढोलम, कुणाल मांजरेकर, आपा मालंडकर, कलाकार भाऊ सामंत, सौ. शुभदा टिकम, सौ. पूजा सरकारे, गजानन मांजरेकर, किशोर सरनोबत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत एक विशेष कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी ही माहिती देण्यात आल्याचे समजते. 


यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना निर्माते भूषण साटम म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि कवी भूषण यांच्यावरील शिवराज भूषण हे महानाट्य डिसेंबर महिन्यात व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करीत आहे. पहिल्या टप्प्यात या महानाट्याचे चार प्रयोग झाले. आता दुसऱ्या टप्प्यात सिंधुदुर्गात कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग आणि कणकवली याठिकाणी हे महानाट्य सादर होईल, तर तिसऱ्या टप्प्यात हे महानाट्य मुंबईमध्ये सादर होईल. शिवाजी नाट्य मंदिर - दादर, गडकरी रंगायतन ठाणे, विश्वनाथ भावे नाट्यगृह, वाशी, या तीन ठिकाणी हे महानाट्य सादर केले जाईल. सिंधुदुर्ग विशेषतः मालवणमधील हौशी रंगभूमीवर काम करणाऱ्या ६० स्थानिक कलाकारांच्या संचात सादर होणारे हे महानाट्य सर्वांसाठी अभिमानास्पद आणि भूषणावह गोष्ट आहे. हे महानाट्य व्यावसायिक रंगभूमीवर सादर करण्यामागे कोणताही आर्थिक हिताचा किंवा फायद्याचा विचार न करता केवळ महाराजांचे विचार जनमाणसात पोहचावे हा एकच उद्देश समोर ठेवून शिवराज भूषण हे महानाट्य व्यावसायिक रंगभूमीवर आणत आहोत, असे श्री. साटम म्हणाले.


एकंदर, डिसेंबर महिन्यापासून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करणाऱ्या शिवराज भूषण या महानाट्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभेल, असा विश्वास भूषण साटम व दिग्दर्शक गणेश मेस्त्री यांनी व्यक्त केला आहे असे समजते आहे.


यापूर्वी सादर झालेल्या 'शिवराज भूषण' महानाट्याच्या काही प्रयोगानंतर इतिहास जाणकार, कलारसिक यांनी छत्रपतींच्या काळातील सकारात्मक ऐतिहासिक ऊर्जा देणारे सादरीकरण अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. 'शिवराज भूषण' च्या संचाला 'कृष्णा' अश्वासह पुढील सात्विक वाटचालीसाठी विविध स्तरातून सदिच्छा देण्यात येत आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स