ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
सिंधू यंग चॅम्पियन्स रनची २८ डिसेंबर रोजी दुसरी आवृत्ती.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

सिंधू यंग चॅम्पियन्स रनची २८ डिसेंबर रोजी दुसरी आवृत्ती.

सिंधू यंग चॅम्पियन्स रनची २८ डिसेंबर रोजी दुसरी आवृत्ती. 

Article image


सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सिंधू रनर्स टीम आणि सावंतवाडी पॅलेस बुटीक आर्ट हॉटेल यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधू यंग चॅम्पियन्स रनची दुसरी आवृत्ती २८ डिसेंबर २०२५ रोजी सावंतवाडी राजवाड्यात आयोजित करण्यात आली आहे.


या स्पर्धेत वयोगटानुसार चार धावण्याच्या श्रेण्या ठेवण्यात आल्या आहेत. १० किमी रन (वय १६ ते १९ वर्ष), ५ किमी रन (वय १३ ते १६ वर्ष), ३ किमी रन (वय १० ते १३ वर्ष), १.५ किमी रन (वय ७ ते १० वर्ष) या वयोमर्यादेत धावपटूंना सहभागी होता येईल. 

Article image


नोंदणी संबंधित अधिक माहिती इन्स्टाग्राम व फेसबुकवरील Sindhu- Runners_07 या पेजवर उपलब्ध आहे. या स्पर्धेचे नोंदणी शुल्क १० किमी ₹१०००, ५ किमी ₹८००, ३ किमी ₹६००, १.५ किमी ₹४०० असे ठेवण्यात आले आहे. 


सर्व नोंदणीकृत सहभागींना टी - शर्ट, पदक आणि पूर्णता प्रमाणपत्र दिले जाईल. स्पर्धेदरम्यान पाणी आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील, तसेच स्पर्धेनंतर अल्पोपहार दिला जाईल असे समजते आहे.


ही स्पर्धा सावंतवाडी राजवाडा येथे होणार असून स्पर्धेची वेळ १० किमी रनसाठी रिपोर्टिंग सकाळी ५:३० व सुरुवात ६:००, ५ किमी रनसाठी रिपोर्टिंग सकाळी ६:०० व सुरुवात ६:३०, ३ किमी रनसाठी रिपोर्टिंग सकाळी ६:३० व सुरुवात ७:००, १.५ किमी रनसाठी रिपोर्टिंग सकाळी ७:०० व सुरुवात ७:३० वाजता होईल. 


नोंदणी प्रक्रिया सहभागींनी runindia ऑनलाइन फॉर्मद्वारे नोंदणी करावी. फॉर्मसाठी QR कोड कार्यक्रमाच्या जाहिरात पोस्टर्सवर उपलब्ध आहे. नोंदणीची अंतिम तारीख ५ डिसेंबर २०२५ आहे. १५ नोव्हेंबर पूर्वी नोंदणी करणाऱ्यांना २०% सवलत मिळेल, त्यामुळे पालकांनी लवकरात लवकर आपल्या मुलांची नोंदणी करावी.



२०२४ मध्ये सिंधू रनर्स टीममधील प्रसाद कोरगावकर आणि ओंकार पराडकर या दोन धावपटूंनी साऊथ आफ्रिका येथे झालेल्या कॉम्रेडस मॅरेथॉनमध्ये भारताचे 'सुफल तथा पदकप्राप्त' प्रतिनिधित्व केले होते.


या स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी ओंकार पराडकर (सावंतवाडी) 9420307187, डॉ. स्नेहल गोवेकर (सावंतवाडी) 9422373922, डॉ. सोमनाथ परब (मालवण) 9764235276, डॉ. प्रशांत मडव (कणकवली) 9422963712, डॉ. प्रदीप वेंगुर्लेकर (वेंगुर्ला) 9420742440, भूषण बांदलकर (कुडाळ) 9527387727, सुजाता रासकर (ओरोस) 9686601156 यांच्याशी संपर्क साधता येईल अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स