श्री दत्त मंदिर, भरड येथील काकड आरती सोहळ्याच्या सांगतेला शेकडो भाविक उपस्थित.
श्री दत्त मंदिर, भरड येथील काकड आरती सोहळ्याच्या सांगतेला शेकडो भाविक उपस्थित.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात कार्तिक स्नान समाप्तीच्या निमित्ताने बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी पालखी प्रदक्षिणा सोहळा संपन्न झाला. यावेळी टाळ मृदूंगाच्या साथीने आणि ढोल ताशांच्या गजरात जयघोष करण्यात आला. या सोहळ्यास शेकडो भाविक सहभागी झाले होते अशी माहिती मिळत आहे.
मालवण शहरातील भरड येथील जागृत देवस्थान असलेल्या एकमुखी दत्त मंदिरात गेले महिनाभर सुरु असलेल्या काकड आरती सोहळ्याची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला झाली.
कोजागरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पासून काकड आरतीला प्रारंभ झाला होता. रोज पहाटे ५:१० वाजल्यापासून ते ७:१५ वाजेपर्यंत काकड आरती होत होती. मंगलमय आणि भक्तीपूर्ण वातावरणात होणाऱ्या या काकड आरतीमुळे भरड मालवण परिसर भारून गेला होता. बुधवारी पहाटे ५ वाजल्यापासून ७ वाजेपर्यंत काकड आरती संपन्न झाली. त्यानंतर दत्त मंदिरापासून महापुरुष स्थानाना भेट देत दत्त महाराजांची पालखी प्रदक्षिणा संपन्न झाली. संतांचे अभंग गात आणि श्री. दत्त नामाचा जयघोष करत ही पालखी प्रदक्षिणा संपन्न झाली.
यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते. सायंकाळी मंदिरातील तुलसी विवाह आणि श्री दत्त महाराजांची शेजारती संपन्न झाली.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...